Home Breaking News अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवलपूर युनिटमध्ये ठेका मजुराचा मृत्यू कंपनीसमोर आंदोलना नंतर १६...

अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवलपूर युनिटमध्ये ठेका मजुराचा मृत्यू कंपनीसमोर आंदोलना नंतर १६ लाखांची मदत व एक नोकरीचा निर्णय

168

अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवलपूर युनिटमध्ये ठेका मजुराचा मृत्यू कंपनीसमोर आंदोलना नंतर १६ लाखांची मदत व एक नोकरीचा निर्णय

सुवर्ण भारत: रविकुमार बंडीवार
गडचांदुर/कोरपना,प्रतिनिधी

गडचांदूर: अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या आवलपूर युनिटमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. दिनांक ०९ जुलै सकाळी१०.३० सुमारात घटना झाली कामगार सुभाष फुलचंद शेंडे (वय ३५), रा. गणेश नगर, नांदा, हे प्रेरणा कॉन्ट्रॅक्टरमार्फत कंत्राटी पद्धतीने काम करत होते. सीसीआर कँटीनजवळ त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ ॲम्ब्युलन्स बोलावून त्यांना कंपनीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अधिकच बिघडल्यामुळे त्यांना चंद्रपूर येथील बुक्कवार हॉस्पिटलमध्ये व नंतर नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान काल सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

कामाच्या वेळी मृत्यू झाल्यामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी त्वरित आर्थिक मदत व एक नोकरीची मागणी केली. यासाठी त्यांनी मृतदेह कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठेवून आंदोलन सुरू केले. या घटनेमुळे कंपनी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मोठ्या संख्येने कामगार एकत्र आले. पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था ठेवत बाहेरील व्यक्तींना कंपनीत प्रवेश दिला नाही.

समजुतीने आंदोलनाचा शेवट

एल अँड टी वर्कर्स युनियनचे अध्यक्ष नरेश पुगलिया यांच्या माध्यमातून व युनियनचे कार्याध्यक्ष शिवचंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली उद्योग प्रमुख श्रीराम पी.एस. यांच्या उपस्थितीत कंपनी व्यवस्थापन व मृतकाच्या कुटुंबीयांमध्ये चर्चा झाली. उशिरा रात्री समजुतीने आंदोलनाचा शेवट झाला.

या वेळी आशीष देरकर, अभय मुनोत, प्रकाश बोरकर, हारुन सिद्दीकी, उमेश राजूरकर, शैलेश लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. रात्री ११:३० वाजता मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

१६ लाखांची मदत व एक नोकरी

या आंदोलनानंतर मृतकाच्या कुटुंबाला एकूण १

६ लाख रुपयांची आर्थिक मदत आणि एक सदस्याला नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये १५ लाख रुपयांचा धनादेश आर्थिक मदतीसाठी तर १ लाख रुपयांचा धनादेश अंत्यसंस्कारासाठी देण्यात आला. उपचाराचा संपूर्ण खर्च कंपनीने उचलला. तसेच पुरवठा विभागात कुटुंबातील एका सदस्याला नोकरी दिली जाणार आहे. पीएफ व विमा यासह आणखी ४ ते ५ लाख रुपये मिळतील. त्यामुळे कुटुंबाला एकूण मिळून सुमारे २० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.