•

भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांची मुख्याधिकाऱ्यांसोबत बैठक
सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
घुग्घुस : भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांची शिष्टमंडळासह घुग्घुस नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजणकर यांच्यासोबत नगर परिषदेच्या कार्यालयात गुरुवार, १० जुलै रोजी बैठक पार पडली.
याप्रसंगी शहरात पोलिस ठाण्यासमोर हायमास्ट लाईट लावणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सिसिटीव्ही कॅमेरे लावणे, रस्त्यालगत पथदिवे लावणे, शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती करणे, तुकडीजी नगर येथील अंगणवाडी क्रमांक २४ च्या खुल्या जागेवर भिंत बांधून सौंदर्यीकरण करणे, केमिकल नगर येथील सर्वे क्रमांक २०२ च्या खुल्या जागेवर भिंत बांधून सौंदर्यीकरण करणे, शहरात डेंग्यू प्रतिबंधक औषधीची फवारणी करणे अश्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली. मुख्याधिकारी निलेश रांजणकर यांनी सर्व समस्यांचे तत्काळ निराकरण करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजयुमोचे गणेश कुटेमाटे, चिन्नाजी नलभोगा, सिनू इसारप, बबलू सातपुते, तुलसीदास ढवस, इर्शाद कुरेशी, स्वप्नील इंगोले, मोगली लक्काकुला, सिनू कोत्तूर, मोमीन शेख, शंकर सिद्दम, हेमंत कुमार, योगेश घोडके, असगर खान, उमेश दडमल, गणेश राजूरकर, सुधाकर आसुटकर, सचिन राजूरकर, विनोद पिंपळशेंडे, अजय लेंडे, हनुमान खडसे आदींची उपस्थिती होती.


