#Ballarpur
• बल्लारपूर पेपर मिल मजदुर सभा तर्फे निःशुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे अयोजन
सुवर्ण भारत: विशाल डुंबेरे
जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
बल्लारपूर : श्री माता कन्यका सेवा संस्था, चंद्रपूर व शालिनीताई मेघे हॉस्पीटल व रिसर्च सेंटर वानाडोंगरी, नागपूर यांच्या वतीने माजी खासदार व बल्लारपूर पेपर मिल मजदुर सभाचे अध्यक्ष नरेशबाबू पुगलीया यांच्या मार्गर्शनात निःशुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे अयोजन बल्लारपूर पेपर मिल मजदुर सभा तर्फे करण्यात येणार आहे.
पेपर मिल मध्ये काम करणाऱ्या सर्व

कामगारांना व त्यांच्या कुटंबियांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक १२ जुलै २०२५ वेळ – दुपारी १२.०० ते सांय. ०५.०० वा पर्यत स्थळ – इंदिरा गांधी स्टेडियम, आयडियल स्कुल जवळ, बल्लारपूर शिबिर राहणार
शिबिराची वैशिष्ये
१) शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांची निःशुल्क तपसणी केल्या जाईल.
२) रुग्णांना नेत्र शस्त्रक्रिया साठी योग्य सल्ला व मार्गदर्शन केले जाईल.
३) मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची शालिनीताई मेघे हॉस्पीटल व रिसर्च सेंटर वानाडोंगरी नागपूर येथे निःशुल्क शस्त्रकिया केली जाईल.
४) मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची ने-आण, राहण्याची, जेवणाची मोफत सोय करण्यात येईल.
५) शिबिरात मोतीबिंदू आंढळलेल्या रुग्णांना ऑपरेशनची तारीख शिबिराच्या दिवशी दिली जाईल.
६) रुग्णांनी येतांना आधार कार्ड, राशन कार्ड ची झेरॉक्स प्रत व मोबाईल नंबर सोबत आणावे. आशी माहिती आयोजक बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभा कडून देण्यात आली आहे




