Home Breaking News अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न. गोवरी येथील घटना,आरोपीला अटक ,तुरुंगात रवानगी.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न. गोवरी येथील घटना,आरोपीला अटक ,तुरुंगात रवानगी.

148

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न.
गोवरी येथील घटना,आरोपीला अटक ,तुरुंगात रवानगी.

सुवर्ण भारत: रविकुमार बंडीवार

गडचांदूर/राजुरा….

तालुक्यातील गोवरी या गावातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणांमध्ये आरोपी सुभाष किसन वानखेडे (वय 45 वर्षे), मु.गोवरी याला पोलिसांनी तात्काळ अटक केली व पोकसो अंतर्गत गुन्हा दाखल करून तुरुंगात रवानगी केली.

प्राप्त माहितीनुसार,काल दिनांक 12 जुलै रोजी अल्पवयीन मुलगी घरी खेळत असताना आरोपीने संधी साधली व अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्या मुलीचे आई वडील शेतावर गेले होते.सदर आरोपी हा घराशेजारीच राहतो. घरी कोणीच नसल्याचे पाहून त्याने दुष्कृत करण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकरणाची माहिती मुलीने सायंकाळी आपल्या आईला सांगितली. सदर घटनेची तक्रार पीडित कुटुंबीयांनी राजुरा पोलीस स्टेशनला देताच पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली व पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तुरुंगात रवानगी केली. सदर आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक ३२५/२०२५ कलम ७६,३३२ (क), ३५१ (२) बीएनएस सहकलम ७,८,१२ पोक्सो अन्तर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या प्रकरणाचा तपास पुलिस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली
महिला पुलिस उपनिरीक्षक सुवर्णा काळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल नागोराव भेंडेकर करीत आहेत.