• आयुध निर्माणी वसाहतीमध्ये अस्वलाच्या दोन पिलांना रेस्क्यु पथकाने जंगलात पिटाळुन लावले.
भद्रावती तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर
भद्रावती : वाघ बिबट्याचे दर्शन नेहमीच होणाऱ्या भद्रावती शहरातील निर्माणी वसाहतीत अस्वलाच्या दोन पिल्यानी आपला ठिय्या मांडल्याने नागरिकांची . चांगलीच तारांबळ उडाती होती ही माहिती भद्रावती वनविभागाला मिळाल्यानंतर वनविभागाच्या रेस्क्यु पथकाने घटनास्थळी जाऊन कारवाही करीत या अस्वलाच्या दोन्ही पिलांना सुरक्षीतरित्या लगतच्या जंगलात पिटाळुन लावल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला काहि दिवसापुर्वी आयुध निर्माणी वसाहत परीसरात एक आजारी मादी अस्वल आढळुन आले होते. परंतु उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला होता. याच अस्वलाचे हे दोन्ही पिल्ले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.सदर ही कारवाई रेस्क्यु पथक वनविभागाचे पथकाने घटनास्थळी जाऊन या दोन्ही पिलांना लगतच्या जंगलात पिटाळुन लावले अधिकारी विकास शिंदे, पारवे, किशोर मडावी, नितीन राऊत यांनी केली.




