Home Breaking News जिवती तालुक्यातील विविध समस्येचे निराकरण करण्यासाठी सुदामभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात शेतकरी संघटनेच्या...

जिवती तालुक्यातील विविध समस्येचे निराकरण करण्यासाठी सुदामभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला

195

जिवती तालुक्यातील विविध समस्येचे निराकरण करण्यासाठी सुदामभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला

चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.

जिवती : तालुक्यातील शेती संबंधात शेतकर्यांना तहसील कार्यालयामार्फत नोटीस देण्यात येणाऱ्या थांबवून तलाठी रेकॉर्डवर नाव असलेल्या सर्व शेतकऱ्यांचे पट्टा कायम करण्यात यावे .जिवती तालुक्यातील सर्व शेतकर्यांना२०२३-२०२४-२०२५ चे नुकसान भरपाईचे पैसे तत्काळ देण्यात यावे.जिवती तालुक्यातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यामध्येसन२०२३-२०२४-२०२५ चे पिक विम्याची रक्कम तत्काळ जमा करण्यात यावी.
महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावे.जिवती तालुक्यातील सर्व शेतकर्यांना ऑफलाईन सातबारा वरून फार्मर आयडी देण्यात यावे.जिवति तालुक्यातील सर्व शेतकर्यांना कृषी सौर पंपाचे ऑफलाईन सातबाराच्या आधारावरून कृषी सौर पंपाचे वितरण करण्यात यावे.अशा विविध मागण्या घेऊन शेतकरी संघटनेच्या वतीने सुदाम राठोड यांच्या नेतृत्वात दि.२४-०७-२०२५ रोज गुरुवारला दु.१२:०० वा. स्थळ -डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक पासून ते तहसील कार्यालय जिवती पर्यंत शेतकरी धडक मोर्चा काढण्यात आला मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून जिवती तालुक्यातील सर्व शेतकर्यांना तहसील कार्यालय जिवती मार्फत देण्यात येणाऱ्या नोटीस थांबवून ३५ वर्षापासून अतिक्रमण करून व त्या शेतकऱ्यांच्या त्या शेतीवर ताबा आहे अशा शेतकर्याना तलाठी रेकॉर्ड नुसार नोंद असलेल्या सर्व शेतकऱ्यांचे शेतीचे पट्टे कायम करून सर्व सामान्य शेतकर्यांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिवती तालुकाध्यक्ष सुदाम राठोड यांनी केली आहे.मोर्चेत सहभागी स्वतंत्र भारत पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश कदम, युवाध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष विशाल राठोड, देविदास वारे, रवींद्र राठोड, बालाजी पाचंगे, बालाजी कांबळे,बळीराम मस्के, तुकाराम सिडाम, प्रविण पवार, दत्ता राठोड शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.