Home Breaking News शेतकऱ्याची कर्जबाजारी मुळे कंटाळून आत्महत्या

शेतकऱ्याची कर्जबाजारी मुळे कंटाळून आत्महत्या

190

शेतकऱ्याची कर्जबाजारी मुळे कंटाळून आत्महत्या

चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.

जिवती – सततच्या नापिकीमुळे कर्जाचा डोंगर वाढल्याने व खते खरेदीसाठी पैसे नसल्याने मृत शेतकऱ्यांचे नाव- भगवान गोपीनाथ राठोड वय ५८ रा. देवलागूडा शेतकऱ्यांने शेतातील सागवान झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. दिनांक 24 जुलै गुरुवार रोजी सकाळी, ११ वाजता सुमारास उघडकीस आली. भगवान राठोड नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी, गाईचराईसाठी शेतात घेऊन गेले होते. बराच वेळ होऊनही वडील घरी न परतल्याने त्यांचा लहान मुलगा शेतात गेला. यावेळी वडील सागवान झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांने आरडाओरड करीत घरी फोन लावून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच जिवती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत्यू देह ताब्यात घेतला. पोलिसांनी मर्ग दाखल करून पूढील तपास सुरू केला आहे.