हिंदू धर्माचा अपमान कदापी सहन करणार नाही!
युवासेनेच्या वतीने निषेध आंदोलन!
चंद्रपूर : किरण घाटे
भद्रावती:माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिंदू धर्माबाबत केलेल्या आक्षेपार्ह आणि अपमानजनक विधानाचा युवासेनाच्या वतीने राज्यभर तीव्र निषेध करण्यात येत आहे.
या राज्यव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती येथील गांधी चौकात युवासेनेच्या वतीने निषेध आंदोलन करून हिंदू धर्माचा अपमान कधी सहन केला जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.
सदरहु आंदोलन युवासेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आले होते.
विदर्भ सचिव शुभम नवले व युवासेना कार्यकारिणी सदस्य हर्षल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना जिल्हाप्रमुख आलेख रट्टे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
युवा सैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कठोर कारवाईची मागणी या आंदोलन दरम्यान करण्यात आली .
हिंदू धर्माच्या भावना दुखावणाऱ्या विधानांचा निषेध या वेळी करण्यात आला.जर या बाबतीत त्यांनी माफी मागितली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला.
यावेळी शिवसैनिक सुरज शाहा, युवा शिवसैनिक सुमित हस्तक, युवा शिवसैनिक महेश जीवतोडे, उपतालुकाप्रमुख सिंगलदीप पेंदाम, उपशहर प्रमुख मनीष बुच्चे, युवा शिवसैनिक सोनू बोनागिरी, राज चौहान, पीयुष सिंग, शिवसैनिक संदीप चटपकर, रवी ढवस, मुनेश्वर बदखल, यश निमसरकर, हेमंत सातपुते व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.


