वृक्षदिंडीने दुमदुमली घुग्घुस नगरी
सुवर्ण भारत : पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी,चंद्रपूर
घुग्घुस : दि. ०४ ऑगष्ट २०२५ सोमवार रोजी
श्री.साईबाबा ग्रामिण विकास संस्था, गडचिरोली अंतर्गत प्रियदर्शिनी कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, दिनांक ०४ ऑगष्ट २०२५ सोमवार रोजी घुग्घूस ता. जि. चंद्रपूर, लॉयडस् इनफिनाईट फाऊंडेशन व ए.सी.सी. चांदा सिमेंट वर्क्स,अदानी फाऊंडेशनच्या संयुक्त विदयमाने आयोजित भव्य वृक्षदिंडीने संपूर्ण घुग्घुस नगरी दुमदुमून गेली.
यावेळी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी प्राचार्या अनू चोथे तर प्रमुख अतिथी म्हणून लॉयडस् इन्फीनाईट फाऊंडेशन चे सी.एस.आर.सहायक व्यवस्थापक दिपक साळवे, नगर परिषद घुग्घूसचे लेखापाल प्रविण धोंगडे, केंद्र प्रमुख अनिल दागमवार सर, सामाजिक कार्यकर्ते ब्रिजभूषण पाझारे,सी.एस.आर.अधिकारी अनुराग मत्ते, डॉ.वैशाली जोशी, पर्यवेक्षक फाल्गून खामणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दिपक साळवे यांनी वृक्षदिंडीला हिरवी झेंडी दाखविल्यानंतर वृक्षदिंडी स्थानिक बसस्थानक, आठवडी बाजार,गांधी चौक मार्गे लेझीम पथक,बँन्ड पथक घुग्घुस वासीयांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, पोलीस स्टेशन परिसरामध्ये वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी ठिक ठिकाणी नागरीकांनी वृक्षदिंडीचे स्वागत करुन पिण्याचे पाणी व विदयार्थीनींना खाऊचे वाटप केले.
आयोजित कार्यक्रमाचे संचालन बलवंत विखार यांनी तर आभार शालेय मंत्रीमंडळाच्या कु. सोनाली कांबळे हिने केले.


