उत्तुंग प्रतिभेचा आविष्कार
शैला चिमड्यालवार-ॲड.मेघा धोटे
चंद्रपूर- किरण घाटे
एखाद्या व्यक्तीची प्रतिभा कधी आणि कशी विकसित होईल याचे उत्तम उदाहरण म्हणजे शैलाताईचे विविध लेख!
साधारणपणे गुढीपाडवा पासून त्या आणि त्याच्याही आधीपासून त्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या एका व्हाॅट्सअप
गृपवर नियमितपणे लिहित आहे.
संस्कार धारा सदर सुरू झाले आणि त्यांच्या प्रतिभेला नवनवीन पालवी फुटू लागली
अनेक विषयाला हात घालत त्यांचे सर्वंकष लिखाण अधिकाधिक समृद्ध होत गेले.
आज त्यांचे लेखाने अर्धशतक पूर्ण केले.
पन्नास वेगवेगळ्या विषयांवर लिहिणे ही साधी व सोपी गोष्ट नाही.
पण शैलाताईने सातत्य सोडले नाही.
त्या लिहित राहिल्या आणि आज आत्मविश्वासाने त्या म्हणतात की आता आणखी लिहू शकते.
म्हणजे त्यांचा आवाका किती मोठा आहे .याची आपणास सहज कल्पना येईल.आत्मनिर्भर ,रामनामाचा महिमा ,सेवाधर्म, स्थिर निर्मळ विचार ,भावनाशील नशीब
श्रद्धा ,सौंदर्य ,जन्मदिन ,विचारपुष्प
सुख म्हणजे नक्की काय असतं?
मानवी प्रवृत्ती ,जागरूक मन
आयुष्य एक पुस्तक ,शब्दांचे मूल्यमापन ,जन्म मृत्यू
अक्षयतृतीया ,महाराष्ट्र, कामगार दिन
यशापयश ,बालपण बालमन मी कोण?,चाहूल ,ओंजळीतले सुख
कौटुंबिक सौख्य,शिवस्तुती, शिवमहिमा ,स्त्रीजन्माचा अभिमान
वास्तू सदन ,आत्मपरीक्षण
स्मृतिगंध ,मनातील वादळ
अभिजात मराठी संस्कृती,
घरातील बंदिस्त वृद्धाश्रम,अहंकार
वसुंधरेचं हिरवं लेणं ,छत्रछाया पित्याची आभाळमाया ,आशा निराशा,तिमीरातून लख्ख प्रकाश
जेव्हा आई बाप होते ,आपले अस्तित्व,आरोग्याची गुरुकिल्ली
निरपेक्ष भावना ,स्त्री सौंदर्य लावण्यवती,गुरुकृपेचे अमृतमंथन नंतर… ते अंतर ,आपली काळी माती स्तुती आणि निंदा ,स्वाभिमान ग्रामीण संस्कृती,बेधुंद प्रेमवीर
राष्ट्रध्वज तिरंगा
ही यादी जर आपण नजरेखालून घातली तर याची कल्पना आपणास नक्कीच येईल.
सहज सुचल गृपवर त्यांचे लिखाण रोज प्रसिद्ध होत आहे.
आपल्यामध्ये एक प्रतिभासंपन्न लेखिका असल्याचे मत जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे यांनी व्यक्त केले.प्रख्यात कवयित्री व लेखिका शैला चिमड्यालवार यांचा लेखन प्रवास असाच सातत्याने सुरू राहो अश्या शुभकामना देखील त्यांनी त्यांना दिल्या !
आपल्या पासून अनेकांनी प्रेरणा घेऊन लेखणी हाती घ्यावी
आणि साहित्य विश्व समृद्ध करावे.
असं देखील मेघा धोटे यांनी आपलं मत व्यक्त करताना शेवटी म्हटले.


