Home Breaking News • घुग्घुस शहरात कामगार कर्मचाऱ्यांच्या अपघात होताच ट्राफिक सिंग्नल चालु…

• घुग्घुस शहरात कामगार कर्मचाऱ्यांच्या अपघात होताच ट्राफिक सिंग्नल चालु…

78

• घुग्घुस शहरात कामगार कर्मचाऱ्यांच्या अपघात होताच ट्राफिक सिंग्नल चालु…

सुवर्ण भारत : पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घुस : नवनिर्माण बसस्थानक,छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनेकानेक महिन्यापासून ट्राफिक सिंग्नल बंद होते.

नागरिकात चर्चा करण्यात येत आहे की, शासन,प्रशासन स्नान करून कुंभकर्ण वानी झोपले होते. राजकारण नेते थातूरमातूर वृक्षारोपण,रस्ते,रेल्वे गेट वारंवार बंद होत असल्याने,कासव गतीने पुलाचे काम चालु असने यांच्यावर थातूरमातूर निवेदन देत व त्यांच्या नेत्यांच्या दीर्घायुष्यसाठी प्रार्थना करणे,फळ वाटने,रक्तदान शिबीर करणे,मसाला भात वितरण करणे अशा विविध प्रकारचे कार्यक्रम करित राहतात.

पण ट्राफिक सिंग्नल बंद का ! त्याच्याकडे कधी लक्ष नाही दिले फक्त राजकारण करीत राहणार येवढेच शहरात अनेकानेक वर्षांपासून चालु आहे.

काही दिवसा पूर्वी ३० जुलै बुधवार रोजी रात्री ९:२० वाजता बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या परिसरात दोन कामगार कर्मचाऱ्यांच्या अपघात होताच सिंग्नल सुरू झाले. असे नागरिकांकडून वारंवार चर्चा होत आहे, अपघात झाल्यावरच का शासन,प्रशासनला जाग तेव्हाच का येता!
शहरात मंत्री आल्यावरच रस्त्यावरचे गड्डे थातूरमातूर का बुजवतात.

समोर आता शहरातील पहिल्यांदाच नगरपरिषद निवडणूक येत असल्याने थातूरमातूर, छोटे, मोठे,जेष्ठ,सामाजिक नेते जागे झाले आणि थातूरमातूर आंदोलन,निवेदन करीत जागे झाले असेही नागरिकांत चांगलीच चर्चा रंगली.

समोर नगरपरिषद निवडणूकीत आजी,माजी नेत्यांना चांगलाच निवडणूकीच्या फटका बसेल असे चित्र दिसत आहेत.

नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत की ,किती दिवस ट्राफिक सिंग्नल सुरू राहणार व आणि राजकारण नेते व शासन,प्रशासन जडवाहतूकीला मात देणार आणि अपघात नाही होणार असेही नागरिकांकडून बोलण्यात येत आहे.