“जनहितासाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्याचा गौरव!”
महसूल दिनानिमित्त सहायक महसूल अधिकारी अमोल आखाडे यांचा चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार
चंद्रपूर :किरण घाटे

महसूल दिन २०२५ च्या औचित्य साधत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या विशेष समारंभात सहायक महसूल अधिकारी अमोल आखाडे यांना “जिल्हास्तरीय उत्कृष्ट सहायक महसूल अधिकारी – २०२५” या सन्मानाने गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या हस्ते आखाडे यांना प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून हा सत्कार करण्यात आला.
अमोल आखाडे यांनी महसूल प्रशासनाच्या विविध कार्यक्षेत्रात पारदर्शकता, कार्यक्षमता व जनतेशी सुसंवाद राखत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या योगदानाने केवळ वैयक्तिक कार्याचीच नव्हे, तर संपूर्ण महसूल विभागाच्या समर्पित सेवाभावाची ठळक अधोरेखा समाजासमोर उमटली आहे.
“हा सन्मान माझा नाही, संपूर्ण टीमचा आहे…”अशी
भावना व्यक्त करताना अमोल आखाडे म्हणाले, “हा सन्मान माझा वैयक्तिक नाही, तो माझ्या संपूर्ण टीमचा आहे. आम्ही जेव्हा अधिकाधिक लोकांचे प्रश्न सोडवतो, त्यांच्या अडचणींना मदतीचा हात देतो, तेव्हाच खरे समाधान मिळते. घरच्यांना वेळ देणं, सुट्ट्या घेणं – हे सगळं बाजूला राहतं, पण हे काम म्हणजे सेवा आहे आणि ती मी पूर्ण मनापासून करतो.”
ते पुढे म्हणाले, “हा पुरस्कार संपूर्ण महसूल कुटुंबाच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. प्रत्येक सहकाऱ्याच्या योगदानातूनच हे यश शक्य झाले आहे. मी हा गौरव माझ्या सहकाऱ्यांना, कुटुंबाला आणि गावातील प्रत्येक नागरिकाला समर्पित करतो. हा सन्मान माझ्यासाठी नव्हे, तर पुढील कार्यासाठी एक नवी प्रेरणा घेऊन येणारा क्षण आहे.”
या सत्काराने महसूल विभागात प्रामाणिक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक प्रेरणास्तंभ उभा राहिला आहे. या गौरवाने संपूर्ण विभागातील निःस्वार्थ समर्पण व जनहितासाठी झटणाऱ्या वृत्तीला मान्यता मिळाली आहे. “कर्तव्याला जेव्हा प्रतिष्ठा मिळते, तेव्हा प्रेरणा अधिक गडद होते,” हे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.
या कार्यक्रमास आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुधाकर अडबाले, तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, सहायक महसूल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहायक, शिपाई कोतवाल व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
⬜⬜⬜⬜⬜⬜⬜⬜⬜
महाराष्ट्रातील सहज सुचलं परिवार तर्फे अमोल आखाडेंचे अभिनंदन!
अमोल आखाडे यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट सहायक महसूल अधिकारी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे अधिवक्ता मेघा धोटे,ॲड.अंजली गुंडावार, संजीवनी धांडे, सेवानिवृत्त नायब तहसिलदार साधना धकाते विदर्भातील सुपरिचित कवयित्री शैला चिमड्यालवार, जेष्ठ साहित्यिक विजया भांगे सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक सहसंयोजिका नलिनी आडपवार, नाशिकच्या समाजसेविका चैताली आतराम, समाजसेविका कविता जुमडे, चंद्रपूरच्या वास्तुविशारद शिवानी प्रमोद झाडे , अधिवक्ता सारिका टेंभरे, विद्या पिंजारकर , डॉ.सुचिका बुक्कावार, किनवटच्या सुपरिचित रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाटगूरे, अपर्णा चिडे, मुंबईच्या प्रख्यात चित्रकार नूपुर मोडक, कोल्हापूरच्या चित्रकार रश्मि पचारे, नागपूरच्या सुपरिचित कवयित्री प्रा.वैशाली राऊत , ठाण्याच्या कवयित्री मंगल मिसाळ ,चंद्रपूर संस्कार पत संस्थेच्या संचालिका ज्योति घाटे, गायिका रश्मि हिवरे, कवयित्री रोहिणी पराडकर, भद्रावती व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष किरण साळवी, समाजसेविका रजनी रणदिवे, प्रियंका गायकवाड, प्रांजू मखरे, अर्चना चावरे, कन्हानच्या नामवंत मेकअप आर्टिस्ट डॉ.कल्याणी सरोदे, स्नेही पुकारच्या संपादिका संगिता राजेश पिसे, उमरेडच्या कलावंत संगिता चंदनखेडे, सरोज हिवरे, उज्वला निमगडे, पुण्याच्या महिला पत्रकार स्नेहा मडावी, मूलच्या समाजसेविका चंदा कामडी, अर्चना समर्थ, गडचिरोलीच्या समाजसेविका कविता मोहरकर, मुंबईच्या प्रा.सुनंदा पाटील, हैदराबादच्या जेष्ठ लेखिका विजया तत्वादी, मनिषा मडावी, सुवर्णा लोखंडे, गायत्री श्रीरामे, सोंदार्य मंडाले, पूनम मडावी ,ऐश्वर्या मंडाले, नागपूरच्या समाजसेविका नयना झाडे, जागतिक पुरस्कार कवयित्री अर्चना सुतार, चंद्रपूरच्या समाजसेविका मीनाक्षी गुजरकर, कोकिळा पोटदुखे, अंजली इटनकर, वैजयंती गहुकर सविता कोट्टी, आदिंनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


