वसंतराव खडतकर यांचे अपघाती निधन
चंद्रपूर : किरण घाटे
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्याच्या चंदनखेडा येथील मुळ रहिवाशी असलेले वसंतराव खडतकर यांचे काल सोमवारी वर्धा येथे एका रस्ता अपघातात दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ७४वर्षाचे होते.त्यांचे मागे पत्नी एक मुलगा व मुलगी आहे.ते जळगाव येथे एका अंत्यसंस्कारासाठी जात होते पण रस्ता अपघातातच त्यांची कायमची प्राणज्योत मालवली.संतोष खडतकर यांचे ते वडील होत.
घटनेचे वृत्त आज कानावर येताच अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
दिवंगत वसंतराव खडतकर यांना सहज सुचलं मित्र परिवारची भावपूर्ण श्रद्धांजली!




