कु.समृध्दी सदानंद मुंडेचे यश
अनेकांनी केले समृध्दीचे अभिनंदन!
चंद्रपूर : किरण घाटे
चंद्रपूर : अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई आयोजित लोकमान्य टिळक जयंती निमित्त सुंदर हस्ताक्षर राज्यस्तरीय स्पर्धा -२०२५ ही दि. १४/०७/२०२५ ते २४/०७/२०२५ या कालावधीत घेण्यात आली.
या स्पर्धेसाठी विविध राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सदरहु स्पर्धा एकूण पाच गटांतून घेण्यात आली. स्पर्धेत गट क्रमांक पाच मधून अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता.त्यामधे एस.एम.जी.विद्यामंदिर ,दिवा -पूर्व या शाळेतील सेमी इंग्रजी इयत्ता दहावीतील कुमारी समृद्धी सदानंद मुंढे या विद्यार्थ्यांनीला उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला आहे.दरम्यान शाळेतील सर्वं शिक्षक वृंद व मुख्याध्यापक यांनी तिचे कौतुक व अभिनंदन करीत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.
