Home Breaking News #Ghugus घुग्घुस शहरात महाविकास आघाडी तर्फे विश्व आदिवासी दिना निमित्य भोजनदान वितरण

#Ghugus घुग्घुस शहरात महाविकास आघाडी तर्फे विश्व आदिवासी दिना निमित्य भोजनदान वितरण

165

#Ghugus
घुग्घुस शहरात महाविकास आघाडी तर्फे विश्व आदिवासी दिना निमित्य भोजनदान वितरण

सुवर्ण भारत : पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

चंद्रपूर : जागतिक विश्व आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजाकडून भव्य दिव्य गोंडी संस्कृतीत नाचत,गाजत रॅली काढण्यात आली तसेच रॅलीची सुरुवात अमराई वार्डातुन सुरुवात झाली असून या रॅलीच्या मार्गाने बहादे प्लॉट परिसरात जवळील महाविकास आघाडीच्या नेते,पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित द्वारा भोजनदान व पिण्याच्या पाणीचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम भोजनदानाची सुरुवात करण्या ऐवजी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस घुग्घुस पुलिस स्टेशन निरीक्षक प्रकाश राऊत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाला हातभार लावण्याकरिता सामाजिक नागरिक व पत्रकार समाजसेवक सुद्धा सहभागी झाले.

याप्रसंगी शिवसेना( उ.बा.ठा) गटांचे वरिष्ठ नेते बालू चिकनकर, शहर अध्यक्ष चेतन (बंटी) घोरपडे, अमित बोरकर, हेमराज बावणे,चेतन बोबडे,गणेश उईके,राष्ट्रवादीचे शरद कुमार, काँग्रेस पक्षाचे राजकुमार वर्मा,विक्रम गोगला, समाजसेवक मारुती जुमनाके, पत्रकार बंधू प्रणय कुमार बंडी आणि साहिल सय्यद, अष्टविनायक बहुउद्देशीय संस्थेचे सचिव धीरज ढोके, आकाश गोरघाटे, सुमेध पाटील, धोबी समाज अध्यक्ष सचिन क्षीरसागर, योगेश पाझारे, अमोल बोबडे, खुशाल,प्रफुल,राहुल आदी उपस्थित होते.