Home Breaking News #Bhadravti • भद्रावतीत पक्ष प्रवेश –शिंदेंच्या जनसेवेवर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांचा शिवसेनेत...

#Bhadravti • भद्रावतीत पक्ष प्रवेश –शिंदेंच्या जनसेवेवर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश!

95

#Bhadravti

• भद्रावतीत पक्ष प्रवेश –शिंदेंच्या जनसेवेवर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश!

#भद्रावती शहरातील किल्लावार्ड येथे आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. भाजप, शिवसेना (UBT) तसेच इतर पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री, जनसेवेचे प्रतीक एकनाथ शिंदे यांच्या विकासदृष्टी, जनहितकारी कामगिरी आणि लोकाभिमुख धोरणांनी प्रभावित होऊन शिवसेनेत आज (शिंदे गटात )प्रवेश केला.
पक्ष प्रवेश कार्यक्रमात शालू घनश्याम महेशकर, घनश्याम सखाराम महेशकर, मोहन मारगोवार, सचिन अशोक कत्तुरवार, गजानन महादेव उके तसेच असंख्य विविध पक्षांचे कार्यकर्ते भगव्या पताकेखाली एकत्रित आले.
कार्यक्रमाला शिवसैनिक सुरज शाहा यांच्या नेतृत्वाचा ठसा उमटला. त्यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या भगव्या पताकेखाली एकत्र येऊन जनतेची सेवा करण्याचा संकल्प केला. यावेळी युवा शिवसैनिक सुमित हस्तक यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.