Home Breaking News #Bhadravti • पत्रकार दिलीप मांढरे भोई गौरव हिरकणी पुरस्काराने सन्मानित

#Bhadravti • पत्रकार दिलीप मांढरे भोई गौरव हिरकणी पुरस्काराने सन्मानित

97

#Bhadravti

• पत्रकार दिलीप मांढरे भोई गौरव हिरकणी पुरस्काराने सन्मानित

सुवर्ण भारत : मनोज मोडक (प्रतिनीधी)

भद्रावती : भद्रावती येथील जेष्ठ पत्रकार तथा भोई समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते,मच्छीमार संस्थेचे विद्यमान अध्यक्ष व चंद्रपूर जिल्हा मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे नवनिर्वाचित संचालक दिलीप मांढरे यांना नागपूर येथील हिंदी साहित्य संमेलनाच्या मधुरंग सभागृहात रविवार दि. १० ला भोई गौरव प्रतिष्ठान तर्फे भोई गौरव हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पार पडलेल्या कार्यक्रमाला दैनिक सकाळचे निवासी संपादक प्रमोद काळबांडे,नागपूर येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ तथा माजी राज्यसभा सदस्य डॉक्टर विकास महात्मे, प्राचार्य डॉ. कृष्णाजी ढाले,अमरावती तिवसा येथील गटविकास अधिकारी नारायण अमझरे, भोई गौरवचे मुख्य संपादक चंद्रकांत लोणारे,प्रकाश लोणारे,राजाराम म्हात्रे, ऍड.अमोल बावणे,नरेंद्र पढाल आदी मान्यवर उपस्थित होते.यासोबतच १०,१२वी परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थी,विद्यार्थिनींचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल दिलीप मांढरे यांचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.