#Mul
# बहुजन समाज पार्टीची समीक्षा बैठक आणि कार्यकर्ता संमेलन संपन्न !

सुवर्ण भारत :किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनीधी
चंद्रपूर:रविवारला पत्रकार भवन मूल येथे समीक्षा बैठक आणि कार्यकर्ता संमेलन दुपारी ११:०० ते २:०० या वेळेत आयोजित करण्यात आले होते .
या सभेचा शुभारंभ दीप प्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष रत्नाकर साठे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा प्रभारी राजेश ब्राह्मणे, धर्मेश निकोसे, विद्याधर लाडे, संतोष साखरकर, उपस्थित होते.
सदरहु बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यावर भर देण्यात आला. सर्वत्र निवडणुका लढवण्याची जोरदार तयारी करण्याची मागणी प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शनात केली.
या वेळी वशिष्ठ वाकडे, मंगला बोरकर, व हंसराज कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किसन केसकर यांनी केले. तर
प्रास्ताविक भाषण शांतिकुमार शाम गेडाम यांनी केले. उपस्थितीतांचे
आभार शशांक लाडे यांनी मानले.
कार्यक्रमात मूल शहर आणि तालुक्यातील अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
याच आयोजित बैठकीत
मंगला बोरकर यांची महिला आघाडी, मूल शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.


