Home Breaking News • 11 ऑगस्टला चेतना दिनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य कर्मचाऱ्यांनी दिली निदर्शने!...

• 11 ऑगस्टला चेतना दिनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य कर्मचाऱ्यांनी दिली निदर्शने! • शेकडों कर्मचारी सहभागी!

295

• 11 ऑगस्टला चेतना दिनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य कर्मचाऱ्यांनी दिली निदर्शने!

• शेकडों कर्मचारी सहभागी!

चंद्रपूर : किरण घाटे

चंद्रपूर : राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या महत्वाच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील “एकस्तर पदोन्नती व प्रोत्साहन भत्ता” पुर्ववत सुरू राहण्याकरीता शासनाने आजपावेतो सुधारीत शासन निर्णय निर्गमित केलेला नाही. त्याअनुषंगाने सर्व कर्मचारी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्यांकडे शासनाचा लक्षवेध करुन घेण्यासाठी सोमवार, दिनांक 11 ऑगस्ट 2025 ला चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 2 वाजता जोरदार निदर्शने देवून चेतना दिन साजरा केला.चेतना दिनी समन्वय समितीच्या माध्यमातून या वर्षी शिक्षण व आरोग्य विभागासाठी राज्यातील कर्मचारी-शिक्षक एकजुट दाखविण्यासाठी तसेच पुढील वर्षी दुसऱ्या दोन घटक संघटनांचे प्रश्न घेतले जातील व अशाप्रकारे या चेतना दिनाची मशाल आपल्याला कायम तेवत ठेवण्यासाठी व प्रलंबित 21 मागण्यांसोबतच दि. २७.०६.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये चंद्रपूर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व आदिवासी क्षेत्रातील “एकस्तर पदोन्नती व प्रोत्साहन भत्ता” बंद करण्यांत आलेला आहे. त्याअनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील “एकस्तर पदोन्नती व प्रोत्साहन भत्ता” पुर्ववत सुरू राहण्याकरीता शासनाने आजपावेतो सुधारीत शासन निर्णय निर्गमित केलेला नाही. शिक्षण व आरोग्यविभागाच्या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शिक्षक व आरोग्य विभागाच्या संतप्त कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर समोर “धरणे आंदोलन” करुन शासनाचा लक्षवेध करुन घेण्यासाठी जोरदार निदर्शने दिली.
या प्रसंगी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दिपक जेऊरकर, राजु धांडे यांनी प्रलंबित मागण्यांसंदर्भात उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. या आंदोलनाचे सुत्र संचालन श्रीकांत येवले यांनी केले तसेच आभार प्रदर्शन चंद्रकांत कोतपल्लीवार यांनी केले.
धरणे आंदोलनात दिपक जेऊरकर, राजु धांडे, श्रीकांत येवले, अविनाश बोरगमवार, श्रीकांत येवले, सिमा पॉल, चंद्रकांत कोतपल्लीवार, रजनी आनंदे, अजय चहारे, प्रविण अदेंकीवार, संदीप ठाकरे, अजय मेकलवार, धनराज मस्के, अतुल किनेकर, लिना जांभुळकर, मनोहर धाईत, संजय बिस्वास, भाग्यश्री श्रीरामे, नारायण मोरे, महेश पानसे तसेच आरोग्य विभाग कर्मचारी, महसुल विभाग, बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, कोषागार कार्यालय, वन विभाग, वस्तु व सेवा कर विभाग, भुमि अभिलेख विभाग, कृषी विभाग, भुविज्ञान-खनिकर्म विभाग, पोलीस अधिक्षक कार्यालय कर्मचारी आदी विभागाचे कर्मचारी व इतर सर्व शासकीय कार्यालयीन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग दर्शविला होता.