Home Breaking News #Gadchandur •गडचांदूर येथील सामाजिक कार्यकर्ते अरविंद गोरे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

#Gadchandur •गडचांदूर येथील सामाजिक कार्यकर्ते अरविंद गोरे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

76

#Gadchandur
•गडचांदूर येथील सामाजिक कार्यकर्ते अरविंद गोरे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

सुवर्ण भारत : मनोज गोरे
चंद्रपूर,प्रतिनिधी

गडचांदूर : शिवसेना पूर्व विदर्भ पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक नागपूर येथील हॉटेल सेंट्रल पॉईंट मध्ये संपन्न झाली.
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ,धर्मवीर आनंद दिघे शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षावर विश्वास ठेवत बंडू हजारे जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर येथील सामाजिक कार्यकर्ते अरविंद गोरे यांनी पक्ष प्रवेश केला आहे.
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. उदय सावंत (उद्योग मंत्री) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. त्यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, शिवसेना सचिव संजयजी मोरे, भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर, विधान परिषदेचे आमदार कृपाल तुमाने, पूर्व विदर्भ संघटक प्रमुख किरण पांडव, चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख किशोर राय, चंद्रपूर जिल्हाप्रमुख बंडू हजारे, कोरपना तालुकाप्रमुख राकेश राठोड, गडचांदूर शहर प्रमुख विकी राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचांदूर येथील सामाजिक कार्यकर्ते अरविंद गोरे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश घेत राजकीय भविष्यात भाग घेतला असून त्यांचा गडचांदूर वार्ड क्रमांक सहा येथे मोठा जनसंपर्क असल्याचे निदर्शनात येते. गोरे यांच्या पक्षप्रवेशामुळे गडचांदुरात शिवसेनेला चांगला पाठबळ मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
यंदाच्या वर्षी गडचांदूर नगरपरिषदेच्या निवडणुकीपूर्वी पुन्हा मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचे तालुकाप्रमुख राकेश राठोड यांचे म्हणणं आहे.