Home Breaking News • वरोऱ्यात नगरपरिषद च्या नियोजन शून्य विकासकामामुळे नागरिक त्रस्त • कोराडी...

• वरोऱ्यात नगरपरिषद च्या नियोजन शून्य विकासकामामुळे नागरिक त्रस्त • कोराडी नाल्याचे पाणी अडत असल्यामुळे अवधूत नगरमध्ये झाला तयार तलाव

89

• वरोऱ्यात नगरपरिषद च्या नियोजन शून्य विकासकामामुळे नागरिक त्रस्त

• कोराडी नाल्याचे पाणी अडत असल्यामुळे अवधूत नगरमध्ये झाला तयार तलाव

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा : वरोऱ्यात नाल्यां,नाले चे पाणी पास न होणे ,तसेच गांधीसागर तलाव ओव्हर फ्लो झाला की पाणी शहरातील काही भागात शिरून रस्त्यांवर तर तलावाचे स्वरूप तयार होतात.परंतु कॉलरी वॉर्डांत घरांमध्ये पाणी शिरतात.अशी भयानक परिस्थिती निर्माण होतात.

शहरातील अवधूत नगरी मध्ये स्वामी समर्थ चे मंदिर आहे.त्याठिकाणी मोठ्या भक्ती भावाने दर्शनासाठी भाविक येत असतात.तसेच त्याठिकाणी एक मोकळे लेआऊट आहे.त्या लेआऊट वर कोराडी नाल्याचे पाणी साचल्यामुळे लेआऊट लागून असलेल्या घराणा पाण्याचा तडाखा पोहचत असून नागरिकांना घरातून बाहेर पडण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पुरातन काळापासून कोराडी नाला अस्तित्वात असून पूर्वीपासून पावसाळ्याचे पाणी याच नाल्याने पुढे पाणी पास होत होते.परंतु याच नाल्याच्या मार्गावर बाय पास रोड झाला असून नाल्याचे पाणी पास होण्यास बाय पास रोड अडसर झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.संबंधित प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष घालून कोराडी नाल्याने सरळ पाणी समोर निघून जाण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी अवधूत नगर मधील नागरिकांनी केली आहे.