• छायाचित्रकार दिना निमित्त बल्लारपूर शहरात एम्बुलेंस चालकांचा सत्कार करण्यात आले
सुवर्ण भारत:शंकर महाकाली(संपादक)
बल्लारपूर : बल्लारपूर फोटोग्राफर असोसिएशन तर्फे एम्बुलेंस चालकाचा शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले
बल्लारपूर नगर परिषद चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर कार्यक्रम पार पडला. शहरातली छायाचित्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बल्लारपूर फोटोग्राफर असोसिएशन दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रकार दिन सामाजिक जबाबदारी जोपासणाऱ्या उपक्रमांद्वारे साजरा करण्याची परंपरा जपत आली आहे. छायाचित्रण या कलाक्षेत्रासह समाजाशी असलेली बांधिलकी अधोरेखित करण्याचे काम संस्थेने केले आहे.
या वेळी अध्यक्ष संजय पुरुषोत्तम वानखेडे, उपाध्यक्ष निलेश घुमे, सहसचिव विवेक गडकर, राहुल कडुकर, कोषाध्यक्ष प्रेमचंद चौधरी यांच्यासह श्रीकांत येनुरकर, दिलीप नाईक, मंगेश सोगे, मिलिंद दारुंडे, राजू सिंग, गुंजन वानखेडे, राज तीतरे, प्रवीण साठे, अनिल रामटेके, निलेश लीचोडे, संजय बोरकर, विकास राजूरकर, रुपेश सिंग, शर्मन अहिरवार आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच ज्येष्ठ छायाचित्रकार सतीश गडकर व प्रेमचंद चौधरी यांचा असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला. या अनोख्या उपक्रमामुळे छायाचित्रकारांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी आणि एम्बुलेंस चालकांच्या कार्याला मिळालेला सन्मान नागरिकांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील.




