Home Breaking News #Chandrapur • पडोलीतील “त्या “पिडित कुटुंबियांना तातडीने करा व गाय मालकावर कठोर...

#Chandrapur • पडोलीतील “त्या “पिडित कुटुंबियांना तातडीने करा व गाय मालकावर कठोर कारवाई करा! • भारतीय कॅम्युनिस्ट पार्टीची चंद्रपूर जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडे मागणी!

76

#Chandrapur
• पडोलीतील “त्या “पिडित कुटुंबियांना तातडीने करा व गाय मालकावर कठोर कारवाई करा!

• भारतीय कॅम्युनिस्ट पार्टीची चंद्रपूर जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडे मागणी!

चंद्रपूर – राजेश येसेकर

चंद्रपूर : पडोलीत एका मोकाट गायीने हल्ला चढवत एका साठ वर्षीय महिलेचा जीव घेतला तर अन्य दोन महिलांना गंभीर जखमी केले होते.
त्या पैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे पडोली निवासी प्रकाश रेड्डी यांनी    सागीतले
दरम्यान याच संदर्भात आज सोमवारी भारतीय कॅम्युनिस्ट पार्टीचे पदाधिकारी रविन्द्र उमाठे, प्रकाश रेड्डी,राजू गैनवार व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक गोठे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना एक लेखी निवेदन सादर केले .
घटनेतील मृतक व गंभीर जखमी झालेल्या कुटूंबातील परिस्थिती अतिशय हलाखीची आहे . जखमींना खासगी रुग्णालयात जाऊन उपचार करणे शक्य नाही.
शासनाने त्यांना मदतीचा हात द्यावा तसेच संबंधित गाय मालकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी भारतीय कॅम्युनिस्ट पार्टीच्या वतीने करण्यात आली.
पडोलीत मोकाट जनावरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून या कडे स्थानिक प्रशासन लक्ष पुरवित नसल्याचा आरोप इंदिरा नगर वार्डातील जनतेनी केला आहे.याच वार्डात गायीने सहा दिवसांपूर्वी हल्ला चढवित बेबी बाबुराव भगत या महिलेचा जीव घेतला होता .