Home Breaking News ⬜⬜श्री गणेश⬜⬜

⬜⬜श्री गणेश⬜⬜

169
Oplus_16777216

⬜⬜श्री गणेश⬜⬜

गजानना गणराया
गणपती विघ्नहर्ता
आतुरता तु येण्याची
सुखकर्ता दुःखहर्ता //१//

वक्रतुंड भालचंद्र
एकदंत लंबोदर
गजवक्र विनायक
ओमकार मोरेश्वर //२//

अधिपती गणपती
बुध्दी चा असे देवता
चिंतामणी हरे चिंता
भक्त संकटीं असता //३//

पार्वतीच्या नंद लाला
प्रथम पुजेचा मान
देवांचा तो अधिपती
गाऊ त्यांचे गुणगान //४//

रुप साजिरे गोजिरे
दिसे किती ते सुंदर
घरी होता आगमन
घराचे होई मंदिर //५//

श्रीगणेशा एक ईच्छा
पूर्ण करावीस आता
आशीर्वादा ने तुमच्या
सुखी होवो माता पिता //६//

🟧🟨कु.मंगल शामराव मिसाळ
सहज सुचलं काव्यकुंज सदस्य
⬜⬜⬜ठाणे⬜⬜⬜