• गावकऱ्यांनी दिला वर्षा मांदाडे यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप !
• अंत्यसंस्कारांसाठी जमली अलोट गर्दी !
• सहज सुचलं व किरणदिप परिवारांची भावपूर्ण श्रद्धांजली!
चंद्रपूर –प्रियंका गायकवाड
राजूरा गडचांदूर मार्गावर दोन दिवसांपूर्वी एक भीषण अपघात घडला .
यात सहा जण मृत्युमुखी पडले.काल संध्याकाळी उशिरा खामोना येथील वर्षा मांदाडे,व कोची येथील शंकर पिपरे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.अपघातातील मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी गावकऱ्यांची अलोट गर्दी लोटली होती.
दिवंगत वर्षा मांदाडे ही महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या सदस्या सौंदार्य मांदाडे व ऐश्वर्या मांदाडे यांच्या सख्ख्या काकू होत.
दरम्यान सहज सुचलं व किरणदिप परिवारातील अधिवक्ता अंजली गुंडावार, संजीवनी धांडे,मायाताई कोसरे अधिवक्ता मेघा धोटे, साधना धकाते, शैला चिमड्यालवार, रजनी रणदिवे,किरण साळवी, चंदा कामडी ,रंज्जू मोडक, नलिनी आडपवार, स्नेहा मडावी, मंगल मिसाळ, सविता कोट्टी, वैजयंती गहुकर, अर्चना चावरे, अधिवक्ता हिमानी वाकुडकर, पूनम मडावी, अधिवक्ता कविता मोहरकर, नयना झाडे, शिवानी झाडे,अपर्णा चिडे, साक्षी वाडगूरे, श्रद्धा परिमल, सारिका टेंभरे,चैताली आतराम, अंजली इटनकर, मीनाक्षी गुजरकर कोकिळा पोटदुखे, विद्या पिंजरकर, प्रियंका बेन्द्रे, रिना तेलंग, अर्चना जाधव ,ज्योती मोरे यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त करीत दिवंगत वर्षा मांदाडे व शंकर पिपरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली.



