Home Breaking News #Ballarpur • मनसे महिला सेनेला मिळाले बल्लारपूरात नवे बळ ! •...

#Ballarpur • मनसे महिला सेनेला मिळाले बल्लारपूरात नवे बळ ! • अनेकांनी केला पक्ष प्रवेश

181

#Ballarpur
• मनसे महिला सेनेला मिळाले बल्लारपूरात नवे बळ !

• अनेकांनी केला पक्ष प्रवेश

सुवर्ण भारत : किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनीधी

बल्लारपूर :महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या बल्लारपूर तालुकाध्यक्ष कल्पना पोतर्लावार यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा नुकताच बल्हारपूर नगरीत पार पडला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होत विविध क्षेत्रातील शेकडो महिलांनी मनसेत प्रवेश करून पक्षाच्या बळकटीस हातभार लावला आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार होते यावेळी जिल्हासचिव किशोर मडगुलवार, मनवीसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, पोंभुर्णा तालुकाध्यक्ष आशिष नैताम, चंद्रपूर तालुकाध्यक्ष प्रकाश नागरकर, ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे,यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती. कल्पना पोतर्लावार या वेळी बोलताना म्हणाल्या कि“महिला सक्षमीकरणासाठी, त्यांच्या हक्कासाठी व समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच हा एक पर्याय आहे. आज इतक्या मोठ्या संख्येने महिलांनी पक्षात प्रवेश केला याचा मला अभिमान आहे.”
मनसेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की राज ठाकरे यांचे हाथ बळकट करण्यासाठी आपण आज मोठ्या संख्येने मनसे परीवारामध्ये सहभागी झालात ज्या विश्वासानी तुम्ही मनसेचा झेंडा हाती घेतला त्या विश्वासाला आम्ही कधीच तडा जाऊ देणार नाही .
या कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार यांनी परीश्रम घेतले . महिलांच्या पक्ष प्रवेशामुळे मनसे महिला सेनेची ताकद बल्लारपूर तालुक्यात अधिक वाढली असून आगामी काळात या ताकदीचे रूपांतर समाजहिताच्या चळवळीत होईल, असा विश्वास अनेकांनी यावेळी व्यक्त केला . उपरोक्त कार्यक्रमाला प्रविण शेवते, राजु देवांगन, रुग्णमित्र क्रिष्णा गुप्ता, मनविसे पोंभूर्णा तालुका उपाध्यक्ष राजेश गेडाम, फिरोज पठान, आशिष चटपल्लीवार निखील दुर्ग चिंन्दु दुर्गे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते