Home Breaking News • गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद उत्सव सुरळीत पाडण्यासाठी प्रशासन सज्ज ! •...

• गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद उत्सव सुरळीत पाडण्यासाठी प्रशासन सज्ज ! • सिंदेवाहीत पार पडली शांतता समितीची बैठक

118

•  गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद उत्सव सुरळीत पाडण्यासाठी प्रशासन सज्ज !

• सिंदेवाहीत पार पडली शांतता समितीची बैठक

चंद्रपूर – किरण घाटे

चंद्रपूर:गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज दि.१ सप्टेंबरला सकाळी 11.30 वाजता पोलिस स्टेशन सिंदेवाहीच्या वतीने स्थानिक तुलसी मंगल कार्यालयात शांतता समितीची एक बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदरहु बैठक ब्रम्हपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या वेळी प्रामुख्याने सिंदेवाहीचे तहसीलदार संदीप पाणमंद,नगराध्यक्ष भास्कर ननावरे, कनिष्ठ अभियंता रामटेके या शिवाय नगर पंचायतचे अधिकारी, पोलीस निरीक्षक कांचन पांडे, व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आदिं उपस्थित होते.
बैठकीला शांतता समिती सदस्य, महिला दक्षता समितीचे सदस्य, ईद-ए-मिलाद कमिटीचे सदस्यगण पोलीस पाटील, व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, गणेश मंडळाचे पदाधिकारी,व डीजे मालक उपस्थित होते.
बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या वेळी पत्रकार बांधवांनी काही विधायक सूचना मांडल्या. गणेश मंडळांच्या पदाधिकारी व स्थानिक नागरिकांनी पारंपरिक वाद्यां बाबत तसेच डीजेच्या माध्यमातून उत्सव साजरा करताना काय नियम पाळावेत, यासंबंधी प्रश्‍न उपस्थित केले. त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही उपाययोजना सुचविल्या.आयोजित
बैठकीत पोलीस प्रशासनाच्या वतीने समाज बांधवांना सौहार्दपूर्ण वातावरण राखण्याचे आवाहन करण्यात आले .गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे सण व उत्सव शांततेत, परंपरागत व सांस्कृतिक पद्धतीने, एकमेकांना सहकार्य करून साजरे करण्याचे या प्रसंगी सुचित करण्यात आले.