• सावरगावातील ९३ वर्षांची परंपरा कायम– गाव एकोप्यातून गणेशोत्सव होतोय आनंदात व उत्साहात साजरा !
सुवर्ण भारत:रोशन खानकुरे
विशेष जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
बल्लारपूर : शहरी भागात पाश्चिमात्य संस्कृतीचे आक्रमण होत असले तरी ग्रामीण भागात आजही मूळ भारतीय संस्कृती जपली जाते. याचे उत्तम व ताजे उदाहरण म्हणजे नागभीड तालुक्यातील सावरगाव हे होय ! जिथे तब्बल ९३ वर्षांपासून ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेतून गणेशोत्सव भक्तीभावाने व श्रद्धेने साजरा केला जातो!
या बाबतीत
गावकऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की,
“सावरगावकरांनी आजवर ‘एक गाव, एक गणपती’ ही परंपरा अखंडित ठेवली आहे. हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरावा असाच आहे .
गावाच्या एकतेचे प्रतीक म्हणून हा गणेशोत्सव साजरा केला जातो.”
हे येथे विशेष उल्लेखनीय आहे.
प्रत्येक वर्षी गावाच्या हनुमान मंदिरात श्री गणेशाची स्थापना करून धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तन, सांस्कृतिक स्पर्धा आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केल्या जाते. अर्थातच या माध्यमातून गावात एकोपा, बंधुभाव आणि भक्तिमय वातावरण निर्माण होत असते.
यंदाही ग्रामस्थांनी श्री गणेश चरणी प्रार्थना केली की,
“सावरगावसह सर्व शेतकरी व नागरिकांना सुख, समृद्धी आणि भरभराट लाभो.”
सावरगावातील सार्वजनिक गणेश मंडळाने जपलेली ही परंपरा आजही गावाच्या ऐक्याचे व संस्कृतीचे प्रतीक ठरत आहे.हे तितकेच सत्य आहे.

