Home Breaking News • पुलाच्या पुरातुन जीवघेण्या प्रवासात बाळ पोटातच मृत्यु पावले!  • कोसरसार येथील...

• पुलाच्या पुरातुन जीवघेण्या प्रवासात बाळ पोटातच मृत्यु पावले!  • कोसरसार येथील दुर्दैवी घटना

60

• पुलाच्या पुरातुन जीवघेण्या प्रवासात बाळ पोटातच मृत्यु पावले!
 • कोसरसार येथील दुर्दैवी घटना

तालुका प्रतिनिधी :राजेश येसेकर

भद्रावती : आज वरोरा तालुक्यातील बोडखा ते कोसरसार या पुलावर पुराचा पाणीप्रवाह वाढल्यामुळे रुग्णवाहिका येऊ शकली नाही प्रसृती रुग्णाला ग्रामस्थांनाच्या मदतीने पुरामधुन जीव घेणा प्रवास करावा लागला .दुर्दैवाने या प्रवासा दरम्यान बाळ पोटातच मृत्युमुखी पडल्याची ह्रदयदायक घटना घडली.

याच पुलावरून एक आई आपल्या बाळाची प्रकृती ठिक नसल्यामुळे पाण्याने भरलेल्या पुलावरून जात असताना तिला सुध्दा तारेवरची कसरत करावी लागली.
आजच्या आधुनिक युगात सुध्दा रस्ता व आरोग्याच्या मुलभुत सुविधांचा अभाव असल्याने असे जीव गमवावे लागते. ही अतिशय गंभीर बाब आहे.प्रशासनाने याकडे गाभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

काही दिवसापूर्वी शालेय विद्यार्थी सुद्धा कंबर भर पाणी असताना पुलावरून जाण्यासाठी मार्ग शोधत होते. दरवर्षीचा हा त्रास बोडखा मोकाशी या गावातील जनतेला सहन करावा लागतो. पण संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी या कडे दुर्लक्ष करीत असल्याचे एकंदरीत दिसून येते. आजपर्यंत कोणत्याच लोकप्रतिनिधीने या चंद्रपूर जिल्हाच्या सीमेवर असलेल्या शेवटच्या गावावर कधी लक्ष पुरविले नाही. हे खरे वास्तव आहे.

नविन पूल द्यावा असं कोणत्याच लोक प्रतिनिधीला आजपर्यंत कधी वाटले नाही. पाण्याने भरलेला पूल जो पर्यंत कुणाचा जीव घेणार नाही तो पर्यंत झोपी गेलेले प्रशासन खडबडून जागे होणार नाही.