• महाविद्यालयीन मुलीची छेड वरोरा शहरातील घटना
• आरोपीला अटक
सुवर्ण भारत :खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी,वरोरा
वरोरा : पीडित मुलगी महाविद्यालयीन विद्यार्थीन असून ती वेळेनुसार आपल्या महाविद्यालयाच्या मार्गांनी पायी जात असतांना आरोपी ॲक्टिव्हा
गाडीने त्याच मार्गाने येऊन पीडित मुलीच्या समोर येऊन तिची छेड काढली.पीडित मुलीने घडलेला प्रकार फोनद्वारे आपल्या आजीला सांगितला.लगेच आजी आणि पीडित मुलगी वरोरा पोलिसात गेले व तक्रार दखल केली.पोलीस विभागाने घडलेल्या घटनेची तात्काळ दखल घेत घटनास्थळ गाठून त्या मार्गावरील सिसीटिव्ही तपासले असता आरोपी सीसीटिव्ही मध्ये कैद झाला होता.घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली.सदर घटना ४ सप्टेंबर २०२५ ला घडली असून आरोपीचे नाव नासीर अली अख्तर अली वय २६ वर्ष, रा. ईराणी मोहल्ला, कॉलरी वॉर्ड,वरोरा असे आहे.
पीडित मुलगी मूळची हिंगणघाट येथील रहिवाशी असून शिक्षणासाठी ती वरोऱ्यात आजा – आजीकडे राहतात.पीडित मुलगी ही शहरातील एका नामांकित महाविद्यालयात बी ए प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे.घटनेचे दिवशी मुलगी सकाळी ७.०० वाजताचे सुमारास डोंगरवार चौक ते जयभारती चौक या मार्गाने महाविद्यालयात जात असतांना याच मार्गातील राममंदिर समोरील रोडवर आरोपी नासीर अली अख्तर अली हा आपल्या अक्टिव्हा गाडीने मागून आला व समोर गाडी आडवी करून तिची छेड काढली आणि आरोपी तिथून निघून गेला.पीडित मुलगी खूप घाबरली तिला काही सुचत नव्हते.घाबरलेल्या स्थितीत ती आपल्या महाविद्यालयात कशीबशी पोहचली.महाविद्यालयातून तिने आपल्या आजीला फोन करून घडलेला प्रकार कथन केला.आजी आणि पीडित मुलीने पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली.गंभीर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले व सदर मार्गावरील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता आरोपी त्यामध्ये कैद झाला होता.आरोपी नासीर अली अख्तर अली याला पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांचे मार्गदर्शनात सहा.पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी मोलाची कामगिरी करीत कारवाई करून आरोपीला अटक करण्यात यशस्वी झाले.सदर आरोपीवर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.
मुलींच्या छेड काढण्याचे प्रकार वाढीस
वरोरा शहरात नामांकित शाळा,महाविद्यालय असून शहरी ,ग्रामीण भागातील आणि बाहेरून हजारो विद्यार्थी चांगल्या दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी वरोरा शहरात येत असतात.परंतु शहरात मुलींचे छेड काढण्याचे प्रकार वाढीस लागल्याचे दिसून येत आहे.मागच्या वर्षाला आनंदवन परिसरातील एका शाळेच्या विद्यार्थीन सोबत असाच प्रकार घडला होता.या प्रकरणात सदर दोषी मुलावर गुन्हा सुद्धा दाखल झाला.



