• गणेश उत्सव निमित्याने एकलव्य गणेश मंडळ तर्फे उप जिल्हा रुग्णालय येथे फळ वाटप
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा
वरोरा : गणेश उत्सव निमित्याने एकलव्य गणेश मंडळ तर्फे ४ सप्टेंबर २०२५ ला उप जिल्हा रुग्णालय, वरोरा येथे आज रूग्णला फळ वाटप करण्यात आले यावेळी एकलव्य गणेश मंडळ चे सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने उपस्थित होते…
त्याचप्रमाणे एकलव्य गणेश मंडळ तर्फे गणेश उत्सव निमित्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाचे आगमन करण्यात आले, नंतरचे तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये महिला करिता विविध स्पर्धा, लहान मुलांना स्पर्धात्मक खेळ, उर्वरित दिवशी पारपरिक भजन ठेवण्यात आले., ब्लड डोनेशन कॅम्प, ऑर्केस्ट्रा, भजन संध्या इत्यादी विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले आहे..
एकलव्य गणेश मंडळ हे सन 1997 पासून सतत गणपती ची स्थापना करत असून याचा वारसा अतूट राहणार असून यापुढेही चालत राहणार असल्याचे एकलव्य गणेश मंडळाने स्पष्ट केले आहे…
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते अमोल पारोळे, विशाल कोरडे, सुभाष वावरे, रितेश नावकरकर, केवल स्वामी, पवन राम, शुभम मेश्राम, रुपेश बेंडूरकर सहकार्य केले
एकलव्य गणेश मंडळ कडून दिनांक 06/09/2025 रोज शनिवार ला महाप्रसाद ठेवण्यात आले असून सदर महाप्रसाद चा आस्वाद सर्वांनी घ्यावा असे विनंती मंडळ तर्फे करण्यात आले आहे….



