वारंवार कारवाई होवूनही ” तो” करतोय दारु विक्रीचा अवैध व्यवसाय- अखेर गावकऱ्यांनीच पकडून त्यास केले पोलिसांच्या स्वाधीन!
सुवर्ण भारत:शंकर महाकाली
नागभीड : चिखलगाव येथील गजबजलेल्या बसस्टॅण्ड चौकात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय परत एकदा उघडकीस आला आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी धाडस दाखवित दारु तस्कर जनार्दन मेश्रामला दारूसह पकडून तळोधी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
या कारवाईत पोलिसांनी तब्बल 37, 950 रूपये किमतींचा मुद्देमाल जप्त केला असल्याचे समजते.
अवैध दारु विक्रेता मेश्राम हा चहा टपरीच्या आडोशाखाली दारू विक्री करीत होता. यापूर्वीही देखील त्याच्यावर अनेकदा कारवाया झाल्या परंतु त्याने हा व्यवसाय करणे सोडले नाही. तो पोलिसांना न जुमानता आपला अवैध दारु विक्रीचा व्यवसाय करतोय. त्याच्या व्यवसायामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो.गावकरी मंडळींत त्याच्या विषयी संतापाची लाट आहे.
तळोधी पोलिस स्टेशनचे ठाणेदार राहुल घुये यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मानकर, पीएसआय लांबट, एएसआय मेहरकुरे व पथकाने त्याच्यावर अखेर कारवाईचा बडगा उचलला!
दरम्यान वारंवार कारवाई होऊनही त्याचा हा अवैध धंदा सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “पुन्हा हा धंदा सुरू झाला, तर आम्ही यास अजून किती वेळा पोलिसांना पकडून द्यायचे?” असा खडा सवाल देखील गावकऱ्यांनी या उपस्थित केला आहे.चंद्रपुर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या कडे लक्ष देणे तेवढेच गरजेचे व आवश्यक आहे.



