Home Breaking News • रास्त मागण्यांसाठी आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरूच! • आंदोलनाचा आजचा...

• रास्त मागण्यांसाठी आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरूच! • आंदोलनाचा आजचा 18 वा दिवस ! • शासनाने अद्याप त्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही • तीव्र आंदोलन करण्याचा रविन्द्र उमाठेंचा शासनाला इशारा !

230

• रास्त मागण्यांसाठी
आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरूच!
• आंदोलनाचा आजचा 18 वा दिवस ! 
• शासनाने अद्याप त्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही

• तीव्र आंदोलन करण्याचा रविन्द्र उमाठेंचा शासनाला इशारा !

चंद्रपूर – किरण घाटे

चंद्रपूर : शासन दरबारी खितपत पडलेल्या प्रलं बित मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समितीने गेल्या 19 ऑगस्ट पासून स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले असून आज या आंदोलनाचा 18वा दिवस असल्याचे आंदोलनकर्त्यांनी या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
दरम्यान शासन व प्रशासनाने या आंदोलनाची अद्याप दखल घेतली नाही.खासदार प्रतीभा धानोरकर व चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलन स्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांच्या मागण्या सहानुभूतीपूर्वक जाणून घेतल्या.या आंदोलनातून आमच्या रास्त मागण्यां सुटल्यानाहीतर या पेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करु असा इशारा कामगार नेते रविन्द्र उमाठे यांनी आज शासनाला दिला आहे.
या वेळी डॉक्टर शिल दुधे ,मर्सिस्टेला गजर,संकेत जगताप,वर्षा तेलंग, श्वेता कंचर्लावार, विकास वाढई, ज्योति तामगाडगे, चंद्रकांत नेवालकर,रामू बारसागडे,कुंदन देवाळकर,अमर पारखी, मधुकर बोबडे, श्रीकांत भडके व अन्य आंदोलनकर्ते उपस्थित होते.

आंदोलन मंडपात ऐकावयास मिळाली सुरेख भजने !
आज या प्रतिनिधीने आंदोलनास्थळी दुपारी भेट दिली असता आंदोलनकर्त्यांच्या मुखातून मधूर व गोड भजने या वेळी ऐकावयास मिळाली.

जिल्हा परिषद नर्सेस संघटनेचा आंदोलनाला पाठिंबा!
चंद्रपूरात सुरू असलेल्या या धरणेआंदोलनाला जिल्हा परिषद नर्सेस संघटनेने आपला जाहीर पाठिंबा दिला असल्याचे एक लेखी पत्र दुपारी गिता खामनकर, यशोदा राठोड शिल्पा वैद्य,व दुर्गावती गेडाम यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे सोपविले .
या आंदोलनामुळे शासकीय कामकाजावर विपरीत परिणाम झाला असल्याचे सर्वत्र बोलल्या जाते.