• 22 दिवस होवूनही शासनाने आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत कामबंद आंदोलनाची दखल घेतली नाही!
• चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी व कर्मचारी मुंबईकडे आज रवाना!
• आझाद मैदानावर होणार आमरण उपोषण व जेलभरो आंदोलन!
चंद्रपूर – किरण घाटे
चंद्रपूर : प्रलंबित मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समितीने गेल्या 19 ऑगस्ट पासून स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले असून आज या आंदोलनाचा 22 वा दिवस आहे .तीन आठवडे होवून देखील शासनाने त्यांच्या आंदोलनाची अद्याप दखल घेतली नाही.
त्यांच्या कामबंद आंदोलनामुळे आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम झाला असल्याचे बोलल्या जाते.
दरम्यान आज मंगळवारी (9सप्टेंरला) दुपारी आंदोलन मंडपातील काही आरोग्य अधिकारी व कर्मचारी मुंबईकडे रवाना झाले असल्याचे कामगार नेते रविन्द्र उमाठे यांनी आज आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. आता टप्प्याटप्याने आमरण उपोषण व जेलभरो आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानावर होणार असून त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत.
दोन दिवसांपूर्वीच आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कामगार नेते उमाठे यांनी दिला होता.हे सर्वश्रूतच आहे .
मंगळवारी चंद्रपूरच्या मंडप आंदोलन मंडपात प्रामुख्याने
डॉक्टर शिल दुधे , ललिता मुत्यलवार संकेत जगताप,वर्षा तेलंग, श्वेता कंचर्लावार, विकास वाढई, ज्योति तामगाडगे, चंद्रकांत नेवालकर,रामू बारसागडे,कुंदन देवाळकर,अमर पारखी, मधुकर बोबडे, श्रीकांत भडके व अन्य आंदोलनकर्ते उपस्थित होते.



