अधिवक्ता अंजली गुंडावार यांनी घेतली योगशिक्षिका मायाताई कोसरे यांची भेट!
नागपूर : विशेष प्रतिनिधी
किरण दिप व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका तथा
राजूराच्या समाजसेविका अधिवक्ता अंजली गुंडावार यांनी नागपूर मुक्कामी योगशिक्षिका तथा सुपरिचित समाजसेविका मायाताई कोसरे यांची नुकतीच भेट घेतली.
या वेळेस अधिवक्ता गुंडावार यांची कन्या अनुष्का गुंडावार ही उपस्थित होती.ती सध्या शिक्षणासाठी उपराजधानी नागपूरात वास्तव्याने आहे.
भेटी दरम्यान अधिवक्ता अंजली गुंडावार व मायाताई कोसरे यांची मूल जानाळा येथील आगामी कार्यक्रमा संदर्भात चर्चा झाली.

