रोटरी क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांना स्टडी ॲप चे विनामूल्य वितरण
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी,वरोरा
वरोरा : विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास सुलभ व्हावा, विषयांचे आकलन व्हावे तसेच गुणवत्तेत वाढ व्हावी याकरिता प्रती ऍप रुपये १७५० किंमततिचे
स्टडी बडी ॲपचे वितरण लोकमान्य विद्यालय इंग्रजी माध्यमाच्या शाळेत करण्यात आले.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक राहुल राखे अध्यक्षस्थानी होते तर रोटरीचे अध्यक्ष योगेश डोंगरवार, सचिव राहुल राहुल पावडे, कोषाध्यक्ष देवानंद गावंडे, इनरव्हील क्लब च्या अध्यक्ष प्राजक्ता डोंगरवार, सचिव संध्या बारई आणि डॉ प्रशांत खुळे उपस्थित होते.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक राहुल राखे यांनी रोटरी क्लबचे च्या सामाजिक कार्याची प्रशंसा करीत रोटरीचे शैक्षणिक क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे अनेक विद्यार्थ्यांना आधार देण्याचे कार्य रोटी ने केले असून ते समाजाकरता दिशादर्शक असल्याचे ते म्हणाले योगेश डोंगरवार यांनी स्टडी ॲप बद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली यामागील उद्देश त्यांनी विशद केला प्राजक्ता डोंगरवार आणि संध्या बारई यांनी आपले मनोगत याप्रसंगी व्यक्त केले.
लोकमान्य विद्यालय आणि लोकमान्य इंग्लिश मीडियम शाळेच्या विद्यार्थ्यांना एकूण लाख पाच हजार रुपयाचे ॲप यावेळी विनामूल्य वितरित करण्यात आले. रोटरीचे सदस्य अदनान साधिकोट यांनी विद्यार्थ्यांना ॲप बद्दल माहिती व प्रात्यक्षिक दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर प्रशांत खुळे यांनी, संचालन प्रयाग ठाकरे तर आभार सौ केशवानी यांनी मानले यावेळी रोटरी क्लबचे सदस्य डॉक्टर राहुल शेंद्रे, रवी शिंदे, सुनील आयचीत, अभिजीत बोथले, आभा सायरे, दर्शना मोदी आदींची उपस्थिती होती.
पुन्हा लवकरच हिरालाल विद्यालय अरविंद विद्या निकेतन आणी कर्मवीर विद्यालय इथे रोटरी क्लब वरोरा तर्फे स्टडी बडी ऍप ज्याची किंमत १७५० रुपये आहे ते दहावी च्या विद्यार्थ्यांना विनामूल्य वितरण करण्यात येईल

