#Ballarpur
• बल्लारपुरात भाजपाची नियोजन बैठक संपन्न
• बैठकीत भविष्यातील कार्यक्रम, संघटन विस्तार व जनसंपर्क मोहिमेंवर विस्तृत चर्चा!
सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)
बल्लारपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री डॉ. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा आणि विधानसभा संघटन प्रभारी रामजी लखिया यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच शहराध्यक्ष अधिवक्ता रणंजय सिंह व तालुका अध्यक्ष पिंटू देऊळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा बल्लारपूर शहर व तालुक्याची स्थानिक गोपाला हॉटेल मध्ये नियोजन बैठक पार पडली .
या बैठकीत आगामी काळातील पक्षाचे विविध उपक्रम, संघटनात्मक विस्तार व जनसंपर्क मोहिमांचे सविस्तर नियोजन करण्यात आले. कार्यपद्धतीला बळकटी देण्यावर, युवकाचा सहभाग वाढवण्यावर आणि बूथ पातळीवरील कार्यक्षमतेवर भर देण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.सदरहु
बैठकीला निलेश खरबडे, मनीष पांडेय, सतीश कनकम, देवेंद्र वाटकर, घनश्याम बुरडक, गुलशन शर्मा, गणेश टोंगे, मल्लेश अण्णा, वैशाली बुद्धलवार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.
बैठकीच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले . आगामी काळात भाजपाचा जनसंपर्क अधिक प्रभावीपणे वाढवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
