Home Breaking News #Ballarpur • नवरात्री उत्सवासाठी नियोजनाची सुरुवात • भाजपा महिला कोर समितीची...

#Ballarpur • नवरात्री उत्सवासाठी नियोजनाची सुरुवात • भाजपा महिला कोर समितीची बैठक संपन्न

147

#Ballarpur
• नवरात्री उत्सवासाठी नियोजनाची सुरुवात

• भाजपा महिला कोर समितीची बैठक संपन्न

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर : भाजपा बल्लारपूर शहर महिला कोर समितीची महत्वाची बैठक 72-बल्लारपूर विधानसभा प्रमुख चंदनसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पार पडली. येत्या नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात भव्य सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत प्राथमिक नियोजन यावेळी करण्यात आले.

बैठकीत भाजपा मंडळाध्यक्ष व पुरुष बूथ सशक्तीकरण अभियान प्रमुख रणंजय सिंह, महिला मोर्चा अध्यक्षा वैशाली जोशी, रेणुका दूधे, महामंत्री आरती अक्केवार, वर्षा सुन्चुवार, कांता ढोके, माजी नगरसेविका व महामंत्री सारिका कणकम तसेच माजी नगरसेविका व महामंत्री जयश्री मोहुर्ले यांच्यासह महिला कोर समितीच्या सर्व सदस्यांची उपस्थिती लाभली होती.

सदरहु बैठकीत समाजसेवा, महिला सबलीकरण आणि सांस्कृतिक जपणूक यावर विशेष भर देण्यात आला. येत्या उत्सवात महिलांच्या सहभागातून विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

“भाजपा महिला मोर्चा हे केवळ राजकीय व्यासपीठ नसून समाजसेवेचे एक सशक्त माध्यम आहे. नवरात्रीच्या निमित्ताने महिलांना एकत्र आणत सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांना बळ देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे,” असे वैशाली जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले.