Home Breaking News ‼️⚪शिक्षक‼️-⚪

‼️⚪शिक्षक‼️-⚪

119

-‼️⚪शिक्षक‼️-⚪

 

शिक्षण एक संस्कार
शिक्षक त्याचा शिल्पकार
आदर्श नागरिक घडविण्याचा
शिक्षक व शिक्षण असे आधार //१//

शिक्षण म्हणजे ज्ञानदाता
सुसंस्कारित पिढीचा निर्माता
को-या पाटीचा असे
शिक्षक भाग्यविधाता. //२//

शिक्षक ज्ञानाचे भांडार
रूजवी बीज ज्ञानाचे
जीव ओतून घडविता
काम करी कुंभाराचे //३//

विद्यार्थ्यांनचे सोने करण्या
शिक्षक होतो परीस
स्पर्धेच्या युगात टिकण्या
शिक्षक करी रात्रीचा दिस. //४//

ज्ञानाची ज्योत पेटवित
मुलांना घडवितो
अज्ञानाच्या अंधारातून
त्यांना प्रकाशाकडे नेतो //५//

🌺⚪कु.मंगल शामराव मिसाळ सहज सुचलं काव्यकुंज ठाणे