⚪‼️डोळ्यातल्या डोहात ⚪‼️
दुःखाचे वार झेलता
झाल्या जखमा काळजाला
स्वप्न झाले चकणाचूर
हरली ती साहसाला… १
डोळ्यातल्या डोहात तिने
पहिले हो क्षणभर
वेदनांचा झरा वाहतांना
कोलमडली ती जागेवर.. २..
कसे कुणा सांगावे
तिच्या या दुःखांती
थोडं खंबीर होताच
अश्रू रिते केले एकांती… ३..
केलेच तिचे तिने सांत्वन
विचार केला सुरळीत
आपल्याच……माणसांना
उगा का करू व्यथित… 4…
⚪‼️ शैला चिमड्यालवार
सहज सुचलं मार्गदर्शिका सावली

