Home Breaking News सावली तालुक्यातील साखरी व सिर्सी गावांत वरिष्ठांची परवानगी नसताना वाटपात मिळालेल्या शेतजमीनींची...

सावली तालुक्यातील साखरी व सिर्सी गावांत वरिष्ठांची परवानगी नसताना वाटपात मिळालेल्या शेतजमीनींची परस्पर विक्री? • पटवा-यांने घेतले नोंदवहीत फेरफार ; मंडळ अधिका-यांनी केले फेरफार रुजू! • नागरिकांनी केली चौकशीची मागणी !

440

• सावली तालुक्यातील साखरी व सिर्सी गावांत वरिष्ठांची परवानगी नसताना वाटपात मिळालेल्या शेतजमीनींची परस्पर विक्री?

• पटवा-यांने घेतले नोंदवहीत फेरफार ; मंडळ अधिका-यांनी केले
फेरफार रुजू!
• नागरिकांनी केली चौकशीची मागणी !

चंद्रपूर : किरण घाटे

शासनाने गरीब कुटुंबांच्या उदारनिर्वाहासाठी काही वर्षांपूर्वी शेतजमीनीचे पट्टे वाटप केले होते .पट्टे वाटपानूसार रितसर त्या जमीनीं त्यांच्या ताब्यात देखील दिल्या होत्या.परंतू याच शेतजमीनींची परस्पर विक्री होवून त्या खरेदीदारांच्या नावाने त्या जमीनीं झाल्या असल्याचे एक मोठे प्रकरण सावली तालुक्यात नुकतेच उघडकिस आले आहे.विशेष म्हणजे ज्यांना ह्या जमीनी वाटपात शासनाने दिल्या होत्या त्या लोकांच्या अज्ञातपणाचा फायदा घेत गैरमार्गांनी त्या शेतजमीनीं विक्रीपत्राव्दारे काही लोकांनी आपल्या नावाने केल्या असल्याचे समजते.ह्या सर्व प्रकरणात दुय्यम निबंधक, मंडळ अधिकारी ,व संबंधित पटवारी जबाबदार असल्याचा आरोप बालाजी नामदेव बावणे यांनी केला आहे .त्यांनी आज मंगळवार दि.१६सप्टेंबरला याच संदर्भात एक लेखी निवेदन चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना सादर केले आहेत.त्या सर्व जमीनीं वाटपातील वर्ग दोनच्या असून विक्रीपत्र किंवा बक्षिस पत्र करतांना त्यात वरिष्ठांची परवानगी असणे आवश्यक आहे.परंतु ह्यात कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे समजते.
जिल्हाधिकारी स्तरावरील एकादे पथक नेमून या सर्व प्रकरणाची चौकशी केल्यास असे अनेक प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच प्रकरणांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी काही दिवसांपूर्वी सावलीच्या तहसिलदारांना चौकशी संदर्भात पत्र दिले असल्याचे समजते.
दरम्यान आज उपरोक्त प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयात
तक्रार सादर करताना धनराज शेंडे,आर.डी.निमगडे ,अरुण मेश्राम,
ज्ञानेश्वर पोहनकर, जपान फूलझेले व बालाजी बावणे उपस्थित होते.