Home Breaking News मूलचे जनमाहिती अधिकारी दिनेश पवार यांच्या विरोधात दत्तात्रय समर्थ यांची राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे...

मूलचे जनमाहिती अधिकारी दिनेश पवार यांच्या विरोधात दत्तात्रय समर्थ यांची राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तक्रार सादर !

334

मूलचे जनमाहिती अधिकारी दिनेश पवार यांच्या विरोधात दत्तात्रय समर्थ यांची राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तक्रार सादर !

किरण घाटे : चंद्रपूर

एका प्रकरणाच्या अनुषंगाने मूलचे समाजसेवक दत्तात्रय समर्थ यांनी माहिती अधिकार अधिनियम २०२५ अन्वये मूलच्या तहसीलदारांना माहिती मागितली होती.याच संदर्भात जनमाहिती अधिकारी दिनेश पवार यांनी काही लोकांना समर्थ यांच्या नावाचा उल्लेख करीत नोटीस बजावले असल्याचे समजते.
समर्थ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना लेखी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की मूल तालुक्यामध्ये तहसिल कार्यालय मूलच्या वतीने अवैध रेती वाहतूक करताना कारवाई केलेल्या ट्रॅक्टर व हायवा वर केलेल्या कारवाईचा अहवाल, चालान सत्यप्रत,लिहून घेतलेले हमीपत्र,जीपीएस.लोकेशन, अर्ज करुन मागितले होते.
पण मूलचे जनमाहिती अधिकारी दिनेश पवार यांनी उपरोक्त माहिती कार्यालयात उपलब्ध असतांना सुध्दा ती न देता काही अवैध रेती व्यवसायिकांना नोटीस देताना चक्क आपल्या नावाचा उल्लेख नोटीस मध्ये केला असल्याचे दत्तात्रय समर्थ यांचे म्हणणे आहे.अश्या या कार्यपद्धतीमुळे अवैधरेती तस्करांकडून आपल्या जिवितास केव्हाही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या या अधिका-यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी दत्तात्रय समर्थ यांनी आज मंगळवारी चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
काल याच संदर्भात राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे एक लेखी तक्रार सादर केली असल्याचे त्यांनी आज चंद्रपूर मुक्कामी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
लवकरच या बाबतीत आपण महसूल आयुक्त नागपूर यांची भेट घेवून त्यांच्या कडे देखील लेखी तक्रार सादर करणार असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करताना दत्तात्रय समर्थ, जेष्ठ नागरिक पुंडलिक गोठे, अंजली इटनकर व कविता दिकोंडवार उपस्थित होते.