Home Breaking News रोटरी क्लब व इनरव्हिल क्लबच्या वतीने व्यापा-यांना छत्रींचे वितरण

रोटरी क्लब व इनरव्हिल क्लबच्या वतीने व्यापा-यांना छत्रींचे वितरण

54

रोटरी क्लब व इनरव्हिल क्लबच्या वतीने व्यापा-यांना छत्रींचे वितरण

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर (तालुका प्रतिनीधी, वरोरा)

वरोरा शहरातील फुटपाथवर बसून व्यवसाय करणाऱ्या काही गरजू छोट्या व्यवसायिकांना स्थानिक रोटरी व इनरव्हिल क्लबच्या वतीने नुकतेच छत्रींचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष योगेश डोंगरवार,सचिव राहुल पावडे, इनरव्हिलच्या अध्यक्षा प्राजक्ता डोंगरवार सचिव संध्या बारई ,रोटरी क्लबचे अमित नाहर, डॉ. विवेक तेला, प्रविन किटे, राम लोया अभिजित बोथले, अभिजित मणियार, चेतन बजाज, पराग पत्तीवार,इनरव्हिलच्या सदस्या झेनाब सद्दीकोट, आभा सायरे ,स्नेहल पत्तीवार, बॉबी पामपट्टीवार आदिं उपस्थित होते.
वरोरा नगरीतील ह्या दोन्ही संस्था गरीब लोकांची काळजी घेणा-या संस्था असल्याची प्रतिक्रिया बाजारपेठेतील अनेक छोट्या व्यवसायिकांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केली.