Home Breaking News • शासकीय वाटप जमीनीं फेरफार संदर्भातील लोकांची तक्रार महसूल मंत्र्यांकडे सादर !...

• शासकीय वाटप जमीनीं फेरफार संदर्भातील लोकांची तक्रार महसूल मंत्र्यांकडे सादर ! • सावली तालुक्यातील प्रकार! कित्येक वर्ष लोटत गेली , पण • अधिका-यांचे मुळीच लक्ष नाही? • दत्तात्रय समर्थ यांनीही केली चौकशीची मागणी

286

#Chandrapur

• शासकीय वाटप जमीनीं फेरफार संदर्भातील लोकांची तक्रार महसूल मंत्र्यांकडे सादर !
• सावली तालुक्यातील प्रकार!
कित्येक वर्ष लोटत गेली , पण 
• अधिका-यांचे मुळीच लक्ष नाही?
• दत्तात्रय समर्थ यांनीही केली चौकशीची मागणी

चंद्रपूर- किरण घाटे

चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल महसूल उपविभागीय अंतर्गत येणाऱ्या सावली तालुक्यातील साखरी या गावात काही भूमिहीन शेतकऱ्यांना शासकीय जमीनीचे वाटप करण्यात आले होते.परंतु काही मंडळींनी त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेत त्या जमिनींची वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता सर्रासपणे
विक्रीपत्र,बक्षीसपत्र,व संमतीपत्र केल्याची बाब उघडकीस आली आहे.
याच संदर्भात सावली तालुक्यातील काही लोकांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा चंद्रपूर दौरा असतांना स्थानिक नियोजन भवनात लेखी तक्रार सादर केली.
ह्यात तत्कालीन दुय्यम निबंधक मंडळ अधिकारी व पटवारी दोषी असल्याचे समाजसेवक बालाजी बावणे यांचे म्हणणे आहे.

उपरोक्त प्रकरणात सखोल व निःपक्षपातीपणे चौकशी करण्याची मागणी बावणे यांनी या पुर्वी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या कडे केली आहे.
जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष पूरवून चौकशी साठी जिल्हास्तरीय पथक नेमावे अशी देखील बावणे यांनी मागणी केली आहे.
या व्यतिरिक्त असे अनेक प्रकरणे या तालुक्यात उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी वरिष्ठांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
विशेष म्हणजे त्यांनी जे काही फेरफार प्रकरणे तक्रार अर्जात दर्शविले आहे .
त्यांचे फेरफार होवून सातबाराच्या नावात दुरुस्ती झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले असल्याचे म्हटले आहे.
एव्हढे वर्ष होवूनही हे सर्व प्रकरणे तलाठी दप्तर तपासणीत उजेडात का आले नाही हे एक कोडेच आहे.
संबंधित तलाठी दप्तरची सखोल तपासणी केल्यानंतर अजून काही प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे
तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे.

“त्या” प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे – सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय समर्थ
अनेक प्रकरणाचा पाठपुरावा करणारे मूल येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय समर्थ यांनी सावली तालुक्यातील साखरी गावात शासकीय वाटप शेतजमीन संदर्भात घडलेल्या शेतजमीनीं विक्री बाबत सखोल चौकशी करीत दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.त्या शेतजमीन विक्री प्रकरणात खरोखरच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे का? पटवा-यांनी विक्रीसाठी दिलेले सातबारा त्या वेळच्या मुळ
सातबाराशी जुळतेय का याचीही चौकशी होणे महत्त्वाचे असल्याचे समर्थ यांनी म्हटले आहे.