Home Breaking News • भरधाव स्विफ्ट डिझायर उभ्या स्कॉर्पिओवर आदळली • महिलेचा जागीच मृत्यू,...

• भरधाव स्विफ्ट डिझायर उभ्या स्कॉर्पिओवर आदळली • महिलेचा जागीच मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक

361

• भरधाव स्विफ्ट डिझायर उभ्या स्कॉर्पिओवर आदळली

• महिलेचा जागीच मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक

सुवर्ण भारत: रवीकुमार बंडीवार
तालुका प्रतिनिधी, कोरपना 

नादाफाटा :राजुरा–गोविंदपूर–आदिलाबाद या नुकत्याच पूर्णत्वास आलेल्या महामार्गावर भीषण अपघात घडला. कोरपण्याहून गडचांदूरच्या दिशेने भरधाव वेगात येणारी स्विफ्ट डिझायर (क्र. MH 40 BJ 7339) ही गाडी लालघोडा फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या स्कॉर्पिओवर जोरदार आदळली.

ही धडक एवढी भीषण होती की, गाडीचे चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाली. या अपघातात गाडीत बसलेली वैशाली कोचाडे (२५, रा. राजुरा) हिचा जागीच मृत्यू झाला. तर करण पंधरे (१७, शिवणी, जि. चंद्रपूर) व प्रेम कोवे (२२) हे दोघे गंभीर जखमी झाले.

जखमींना प्रथम गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

या अपघाताचा पुढील तपास गडचांदूर ठाण्याचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.