Home Breaking News • सांगोडा ग्रामपंचायत व दालमिया सिमेंट कंपनीविरोधात आमरण उपोषण सुरू ...

• सांगोडा ग्रामपंचायत व दालमिया सिमेंट कंपनीविरोधात आमरण उपोषण सुरू • ग्रामस्थांना विश्वासात न घेता जमीन दिल्याचा आरोप; प्रशासनाकडे आठवड्यापूर्वीच निवेदन

415

• सांगोडा ग्रामपंचायत व दालमिया सिमेंट कंपनीविरोधात आमरण उपोषण सुरू

• ग्रामस्थांना विश्वासात न घेता जमीन दिल्याचा आरोप; प्रशासनाकडे आठवड्यापूर्वीच निवेदन

सुवर्ण भारत – मनोज गोरे  प्रतिनिधी /(चंद्रपूर)

सांगोडा येथील शेतकरी विठोबा दिनकर बोंडे यांनी दालमिया सिमेंट कंपनी व ग्रामपंचायत सांगोडा यांच्या विरोधात 23 सप्टेंबर 2025 पासून तहसील कार्यालय कोरपना समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी संबंधित प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे
गावकऱ्यांना विश्वासात न घेता दिलेले नाहरकत प्रमाणपत्र तात्काळ रद्द करावे. ग्रामपंचायतमध्ये झालेल्या आर्थिक भ्रष्टाचाराची चौकशी करून वसुली करावी.पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दादाराव पवार यांच्यावर खोटा अहवाल दिल्याबद्दल कारवाई व्हावी.गायरान जमिनी बेकायदेशीररित्या कंपनीकडे देण्यात आल्याचा तपास करावा.ज्यांच्या जमिनी कंपनीने खदानीसाठी घेतल्या, त्यांना योग्य मोबदला व नोकरी द्यावी.कंपनीने स्थानिक शिक्षित बेरोजगारांना रोजगार द्यावा.खदान क्षेत्रातील गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी पाइपलाइन स्थलांतरित करून पुन्हा सुरू करावी.
“शासन व प्रशासनाने वेळेत निर्णय न घेतल्याने शेतकरी, युवक व सामान्य नागरिकांवर अन्याय होतो आहे. त्यामुळे आता मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील,” असे विठोबा बोडे यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हे मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय बावणे काँगेस कमिटी तालुका अध्यक्ष उत्तमराव पेचे माजी सभापती शामजी रणदिवे माजी उपसभापती संभा कोवे सुरेश मालेकर नितीन बावणे संजय गांधी निराधार माजी अध्यक्ष उमेश राजुरकर शैलेश लोखंडे उपनगराध्यक्ष इस्माईल शेख वामन मुसळे संजय ढवस, विकास भोयर, दिगंबर धोटे महादेव हनुमंते माणिक देवाळकर विजय कोल्हे संतोष पाचभाई विकास अवताडे चरण देवाळकर, शुभम ढवस, सौरव आगलावे आकाश रागीट वैभव भोयर योगेश अवताडे शैलेश रागीट, शुभम देवाळकर जयभारत धोटे बबन भोयर अरुण भोयर आदी गावकरी उपस्थित होते.
उपोषणस्थळी सांगोळा परिसरातील महिला नागरिक, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शवत आहेत. स्थानिक प्रशासनाने तत्काळ या प्रकरणात लक्ष घालून कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.