• नवदुर्गा मातेची भव्य प्रतिष्ठापना राजवाड्यात पार पडली
• आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत धार्मिक वातावरणात कार्यक्रम
सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)
अहेरी: येथील माजी मंत्री आणि विद्यमान आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या राजवाड्यात यंदाही नवरात्रोत्सवानिमित्त नवदुर्गा मातेची प्राणप्रतिष्ठापना भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने संपन्न झाली. घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर, सोमवारी, राजघराण्याच्या पारंपरिक परंपरेनुसार देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
या प्रसंगी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम, त्यांच्या पत्नी तनुश्रीताई आत्राम, पुत्र हर्षवर्धनराव बाबा आत्राम, किष्किंद्रराव बाबा आत्राम तसेच राजपरिवारातील सदस्य आणि परिसरातील असंख्य भाविक उपस्थित होते.
देवीच्या चरणी मनोभावे पूजा अर्चा करण्यात आली आणि राज्यात सुख, शांती व समृद्धी नांदो, जनतेचे जीवन सुजलाम्-सुफलाम् होवो, अशी प्रार्थना आमदार आत्राम यांनी केली.
राजवाड्यातील या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. नवदुर्गेच्या जयघोषाने वातावरणात एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली होती.
राजवाड्यातील ही प्रतिष्ठापना परंपरेप्रमाणे भव्या स्वरूपात पार पडत असून, पुढील नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

