Home Breaking News #Ghugus आ. जोरगेवार यांचे समर्थक युवा नेते आशीष मासिरकर यांची ‘घुग्घुस ग्रामीण’...

#Ghugus आ. जोरगेवार यांचे समर्थक युवा नेते आशीष मासिरकर यांची ‘घुग्घुस ग्रामीण’ युवा संघटक प्रमुखपदी नियुक्ती

106

#Ghugus
आ. जोरगेवार यांचे समर्थक युवा नेते आशीष मासिरकर यांची ‘घुग्घुस ग्रामीण’ युवा संघटक प्रमुखपदी नियुक्ती

सुवर्ण भारत | पंकज रामटेके :  सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

#चंद्रपूर – येथील भाजपा कार्यकर्ता सन्मान मेळाव्यादरम्यान, चंद्रपूर विधानसभेतील आमदार किशोर जोरगेवार यांचे समर्थक आणि युवा नेते आशीष मासिरकर यांची ‘घुग्घुस (ग्रामीण)’ भाजप युवा संघटक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.

या विशेष कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते ना. चंद्रशेखर बावणकुळे, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते आशीष मासिरकर यांचा नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

या वेळी उपस्थित मान्यवरांनी आशीष मासिरकर यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या युवा नेतृत्वाला भरभरून पाठिंबा दर्शविला.

कार्यक्रमात चंद्रपूर व घुग्घुस शहरातील विविध वार्डांमधून आलेले नागरिक, कार्यकर्ते आणि भाजपा समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नियुक्तीमुळे घुग्घुस ग्रामीण भागातील भाजप संघटनेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.