• सावली येथील शासन वाटप शेतजमीन खरेदी विक्री प्रकरणात आ. विजय वडेट्टीवारांकडे गावकऱ्यांची तक्रार सादर !
• उपरोक्त प्रकरणात जातीने लक्ष पुरविण्याची गावकऱ्यांची मागणी
• “असे” अनेक प्रकरणे उजेडात येण्याची दाट शक्यता?
चंद्रपूर : किरण घाटे
चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील साख
री या गावात वाटप झालेल्या शेतजमीन प्रकरणात वरिष्ठांची परवानगी न घेता त्या शेतजमीनींचे खरेदी विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणात झाले आहे.
वास्तविक पाहता शासन वाटप अश्या जमीन विक्री प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे.परंतु अशी परवानगी संबंधित प्रकरणात कुठेही दिसून आली नाही .या प्रकरणात आता गावकऱ्यांनी आपला बुलंद आवाज केला असून त्या अनुषंगाने योग्य चौकशी करून न्याय मिळावा अशी मागणी या पूर्वीच त्यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, त्यानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे , प्रहारचे बच्चू भाऊ कडु व आज रविवारी सावली तालुक्याच्या दौऱ्यावर असताना विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कडे केली आहे.
नुकतीच साखरी गावातील काही मंडळींनी सावली येथे रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना होणार्या अडचणीवर मात करण्यासाठी रस्ता दुरुस्ती करणे बाबतच्या चर्चे करीता आले असताना त्यांनी उपरोक्त लेखी तक्रार सादर करुन या बाबतीत कसे व्यवहार घडत गेले हे त्यांना कागदपत्रे दाखवून समजावून देण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकरणात कुठल्याही अधिका-यांनी लक्ष पुरविले नाही. दरम्यान या बाबतीत समाजसेवक बालाजी नामदेव बावणे यांनी वरिष्ठांना लेखी तक्रार सादर करुन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
या शिवाय सावलीचे सामाजिक कार्यकर्ते कृष्णाजी राऊत यांनी देखील उपरोक्त प्रकरणात लक्ष पुरविण्याची विनंती आमदार विजय वडेट्टीवार यांना केली आहे.
मूलचे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय समर्थ हे लवकरच या बाबतीत नागपूरचे महसूल आयुक्त यांची भेट घेणार असल्याचे समजते.

