#Chandrapur
• गडबोरीत दहशत माजवणारा दुसरा बिबट्या अडकला वनविभागाच्या पिंजऱ्यात
• अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांना आले यश!
चंद्रपूर : किरण घाटे
(विदर्भ विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर जिल्ह्यातील गडबोरी येथील परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वी बिबट्याचा धुमाकूळ सुरू होता .अश्यातच एका हल्ल्यात प्रशील मानकर या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती.त्यामुळे या परिसरात सतत भितीचे वातावरण निर्माण झाले होते.घराच्या बाहेर पडताना अनेकदा विचार करावा लागत होता.विशेषता शाळेकरी मुले अक्षरशः भयभित झाली होती.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता वनविभागाला सदरहु बिबट्याला जेरबंद करणे आवश्यक व गरजेचे झाले होते.यावर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी सातत्याने विचार करीत होते .शेवटी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत या धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला मोठ्या शिताफीने पकडले.
शोध मोहिमेत आरंभी एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले होते.
मात्र गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रशीलचा जीव घेणारा खरा बिबट अजूनही मोकाट फिरत होता. त्याने पुन्हा गावात शिरुन काही जनावरांवर हल्ला करीत जखमी केले, त्यामुळे गावातील वातावरण परत संतापले! या परिसरात असे जीवघेणारे बिबटे किती आहे.हे सांगणे कठीण आहे.पण आज ही या गावातील नागरिक भितीखाली वावरत आहेत.हे मात्र तितकेच खरे आहे.
वनविभागाने हार न मानता अथक प्रयत्न सुरू ठेवले आणि अखेर रात्री-दिवस गस्त घालून दुसऱ्या दिवशी एका मादी बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे (टीटीसी चंद्रपूर), शूटर अजय मराठे व त्यांची संपूर्ण टीम यांनी बिबट्याला बेहोश करून सुरक्षितपणे पिंजऱ्यात बंद केले. पकडलेला बिबट आता टायगर ट्रीटमेंट सेंटर, चंद्रपूर येथे नेण्यात येणार आहे.
जरी दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात आले असले तरी गावकऱ्यांमध्ये अजूनही संभ्रम कायम आहे. नेमका प्रशीलचा जीव घेणारा बिबट्याच पकडला गेला आहे का, की अजूनही तो परिसरात वावरतो आहे, याबाबत स्पष्टता नाही. तरीदेखील वनविभागाच्या अथक परिश्रमांमुळे गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास टाकला असून त्यांनी विभागाच अभिनंदन केले आहेत.
या मोहिमेत स्वाब फाउंडेशनचे अध्यक्ष यश कायरकर व त्यांच्या टीमचे मोलाचे सहकार्य लाभले .





